Eknath Shinde News: 'स्टॅलिन यांच्या 'दिवट्या' मुलाने'; तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांच्या सुपुत्राच्या वक्तव्याचा CM शिंदेनी घेतला समाचार

Eknath Shinde News: ' मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत तामिळनाडूचे क्रीडा मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे.
CM Eknath Shinde News
CM Eknath Shinde Newssaam tv

Eknath Shinde on Udhayanidhi Stalin:

तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांचे सुपूत्र आणि क्रीडा मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्माबद्दल वादग्रस्त विधान केल्यानंतर राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्मांची तुलना मलेरिया आणि डेंग्यूशी केल्याने त्यांच्यावर जोरदार टीका केली जात आहे. भाजप नेत्यांनी उदयनिधी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत तामिळनाडूचे क्रीडा मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे. (Latest Marathi News)

मुख्यमंत्र्यांचं ट्विट जसेच्या तसे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत म्हटलं की, ' तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्या ‘दिवट्या’ मुलाने, उदयनिधीने सनातन धर्म संपविण्याची भाषा आज केली. असे अनेक स्टॅलिन येतील आणि जातील, पण सनातन धर्म या पृथ्वीच्या अंतापर्यंत कायम असेल. स्टॅलिन पाठोपाठ काँग्रेसचाही बुरखा फाटला. सनातन धर्म म्हणजे जातींमध्ये विभागलेला समाज आहे, बाकी काही नाही अशी भाषा कार्ती चिदंबरमने केली आहे'.

'हा केवळ हिंदू धर्मावर हल्ला नाही तर हिंदू संस्कृती, संस्कार आणि उज्ज्वल परंपरेचा त्यांनी अपमान केला आहे. कोट्यवधी हिंदूंच्या भावना दुखावण्याचं पाप त्यांनी केलंय. त्यांच्या विधानामुळे ‘इंडी’आघाडीचा खरा, हिंदूविरोधी चेहरा आज पुन्हा जगासमोर आला आहे. कॉंग्रेसने तर कायमच हिंदूविरोधी भूमिका घेतलेल्या आहेत. काँग्रेसचा राम मंदिराला विरोध होता. हिंदू दहशत वाद हा शब्दप्रयोग त्यांनीच शोधून काढला. चिदंबरम पुत्राने मांडलेली भूमिका काँग्रेसच्या विचारसरणीला धरूनच आहे, अशी टीका मुख्यमंत्री शिंदे यांनी केली.

मुख्यमंत्री शिंदे पुढे म्हणाले, 'प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एक भारत, श्रेष्ठ भारत उभारणीचं काम सुरू आहे. परदेशात भारताचा जयजयकार होतोय. पण देशाचा विकास, प्रगती विरोधकांच्या डोळ्यात खुपतंय. त्यामुळे अशा पद्धतीने विष कालवण्याचं काम ते करत आहेत. शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे आज हयात असते तर ‘इंडी’ आघाडीचे गोडवे गाणाऱ्या उद्धव ठाकरेचे ‘उद्योग’ बघून त्यांना प्रचंड वेदना झाल्या असत्या'.

CM Eknath Shinde News
Maratha Andolan: जालन्याच्या घटनेनंतर मराठा आरक्षणाच्या हालचालींना वेग, मुख्यमंत्र्यांनी बोलवली उद्या महत्वाची बैठक...

'खरं तर उद्धव ठाकरे यांनी उदयनिधी आणि चिदंबरम यांच्या वक्तव्यांचा जाहीर निषेध करायला हवा. त्यांना तसं करायचं नसेल तर आता उदयनिधी स्टॅलिन यांच्याही गळ्यात गळे घालून पुन्हा फोटो काढायलाही हरकत नाही. कारण त्यांनी सुध्दा बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचा गळा घोटून हिंदू विरोधकांच्या गळ्यात गळा घातलेला आहे, असेही ते म्हणाले.

'आज इंडिया आघाडीचा बुरखा फाटला असून हिंदूविरोधी विचार रुजविण्याचे आणि धर्म संपवण्याचे त्यांचे मनसुबे उघड झाले आहेत. मात्र अशा शेकडो आघाड्या एकत्र आल्या तरी ना तर धर्म संपवू शकणार ना हिंदू संस्कृती. ती भारतीयांच्या रक्तात आहे, डीएनएमध्ये आहे, हे समजण्याची कुवत असायला हवी, अशीही टीका त्यांनी पुढे केली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com