Divija Fadnavis: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची लाडकी लेक दहावी उत्तीर्ण, दिविजाला किती टक्के मिळाले?
Divija Fadnavis Passes ICSE Class 10Saam Tv

Divija Fadnavis: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची लाडकी लेक दहावी उत्तीर्ण, दिविजाला किती टक्के मिळाले?

Divija Fadnavis Passes ICSE Class 10: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलगी दहावी उत्तीर्ण झाली आहे. दिविजाने दहावीला ९२ टक्के गुण मिळवले आहेत. सध्या तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
Published on

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस यांची मुलगी दिविजा दहावी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाली आहे. नुकताच सीआयएससीई (CISCE) बोर्डाने दहावीचा निकाल जाहीर केला. दिविजाने ९२ टक्के गुण मिळवले आहे. अमृता फडणवीस यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत ही गुडन्यूज सर्वांसोबत शेअर केली. सध्या दिविजावर सर्वांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

अमृता फडणवीस यांनी नुकताच सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट सर्वांना अक्षय्य तृतीयाच्या शुभेच्छा दिल्या. त्याचसोबत अक्षय्य तृतीयाच्या शुभ मुहूर्तावर त्यांनी दोन गुड न्यूज सर्वांसोबत शेअर केल्या. त्यांनी या ट्वीटमध्ये असे लिहिले की, 'सर्वांना अक्षय तृतीयेनिमित्त हार्दिक शुभेच्छा. आजच्या शुभमुहूर्तावर वर्षा या निवासस्थानी आम्ही छोटीशी पूजा संपन्न करीत गृहप्रवेश केला. आजच्या दिवशीची आणखी एक अत्यंत आनंदाची बातमी आपल्या सर्वांना सांगताना मन खुशीने भरून गेलंय. आमची सुकन्या दिविजा ही १०वीच्या बोर्ड परीक्षेत ९२.६० टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाली आहे.'

यंदा आयसीएसईमध्ये ९९.०९ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. आयसीएसईमध्ये पुन्हा एकदा मुलींनी बाजी मारली आहे. यावर्षी मुलींची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ९९.३७ टक्के आणि मुलांची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ९८.८४ टक्के इतकी आहे.

दहावीमध्ये ६७ विषयांसाठी परीक्षा घेण्यात आल्या होत्या. विद्यार्थ्यांना निकाल cisce.org आणि result.cisce.org या अधिकृत वेबसाइटवर पाहायला मिळेल. आयसीएसई दहावीच्या परीक्षा १८ फेब्रुवारी ते २७ मार्च २०२५ या कालावधीत घेण्यात आल्या होत्या.

Divija Fadnavis: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची लाडकी लेक दहावी उत्तीर्ण, दिविजाला किती टक्के मिळाले?
SSC- HSC Result: दहावी-बारावीच्या निकालाची तारीख ठरली! बोर्डाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून माहिती

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com