सोमाटणे टोल नाका बंद करण्याच्या मागणीसाठी नागरिक रस्त्यावर उतरणार!

6 एप्रिल रोजी सर्व पक्षीय टोल हटाव कृती समिती च्या वतीने सोमाटणे टोल नाक्यावर तीव्र आंदोलन छेडण्यात येणार आहे.
सोमाटणे टोल नाका बंद करण्याच्या मागणीसाठी नागरिक रस्त्यावर उतरणार!
सोमाटणे टोल नाका बंद करण्याच्या मागणीसाठी नागरिक रस्त्यावर उतरणार!SaamTVnews
Published On

मावळ : जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील सोमाटणे फाटा येथील टोल नाक्यावर (Somatane Toll Plaza) बेकायदेशीरपणे टोल वसुली केली जात आहे. केंद्र आणि राज्यशासनाची टोल वसुली कधीच संपली आहे. जनसेवा विकास समिती ने देखील टोल नाका बंद व्हावा यासाठी अनेक प्रयत्न केले होते. मावळ (Maval) मधील या सोमाटणे टोल नाक्यावर स्थानिक नागरिकांकडून देखील टोल वसूली केली जाते. याबाबत आयआरबीच्या (RBI) अनेक अधिकाऱ्यांनी स्थानिकांकडून टोल वसूली केली जाणार नाही अशी आश्वासने दिली होती.

हे देखील पहा :

परंतु, प्रत्यक्षात मात्र टोल वसूली केली जात आहे. या विरोधात मावळात 16 एप्रिल रोजी सर्व पक्षीय टोल हटाव कृती समिती च्या वतीने सोमाटणे टोल नाक्यावर (Toll Plaza) तीव्र आंदोलन छेडण्यात येणार आहे. सोमाटणे येथील टोलचा झोल बंद झालाच पाहिजे अशी मागणी या कृती समितीच्या वतीने करण्यात येत आहे. सर्व पक्षीय पत्रकार परिषदेत तळेगावकरांनी (Talegaon) एक मताने ही मागणी केली. या बैठकीला मनसे, भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय, जनसेवा विकास समिती, विविध संघटनासह सर्व सामान्य नागरिकांनी लावली हजेरी लावली होती.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com