Unlock: राज्यातील चित्रपटगृहे, नाट्यगृहे आजपासून सुरू

राज्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिम देखील वेगाने सुरु
Unlock: राज्यातील चित्रपटगृहे, नाट्यगृहे आजपासून सुरू
Unlock: राज्यातील चित्रपटगृहे, नाट्यगृहे आजपासून सुरूSaam Tv
Published On

मुंबई : राज्यात कोरोनाचा Corona Virus प्रार्दुभाव दिवसेंदिवस कमी होत आहे. कोरोना रुग्णसंख्याही corona देखील आता बऱ्यापैकी आटोक्यात आली आहे. राज्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरण corona vaccination मोहिम देखील वेगाने सुरु आहे. यामुळे टप्प्या- टप्प्याने राज्य अनलॉक होत आहे. त्यातच आजपासून नाट्यगृहे, चित्रपटगृहे cinema Hall सुरु होत आहेत. तसेच आजपासून अम्युझमेंट पार्कही Amusement Park देखील खुली करण्यात येणार आहेत.

हे देखील पहा-

सुरुवातीला राज्य सरकारने शाळा, मंदिरे सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर २२ ऑक्टोबर नंतर सिनेमागृहे आणि नाट्यगृहे सुरु करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. तशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली होती. यासंदर्भात गुरुवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी वर्षा बंगल्यावर थिएटर मालकांची बैठक बोलावली होती.

या बैठकीमध्ये राज्यातील सिनेमागृहे आणि नाट्यगृहे २२ ऑक्टोबरपासून आरोग्याचे नियम पाळून खुली करण्यास परवानगी देण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी घोषित केले होते. या बैठकीत सिनेमागृह आणि नाट्यगृह ५० टक्के क्षमतेने सुरू करण्याबाबत निर्णय झाला आहे.

Unlock: राज्यातील चित्रपटगृहे, नाट्यगृहे आजपासून सुरू
Pune: नवले ब्रिजवर सहा वाहनांचा भीषण अपघात; 3 जणांचा मृत्यू! (पहा video)

मात्र, ५० टक्के क्षमतेची अट शिथिल करावी याबाबत चर्चा करण्यात आली होती. आर्थिक कोंडीत सापडलेल्या एक पडदा चित्रपटगृहाना कसा दिलासा देता येईल, याकरिता योग्य तो तोडगा वित्त विभागाच्या समन्वयाने काढण्यात येईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले होते. कलाकार, पडद्यामागचे कलाकार, रंगकर्मी, प्रेक्षक अशा सर्वांनाच या नियमावलीचे पालन करणे बंधनकारक असणार आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com