Eknath Shinde : राज ठाकरेंच्या भेटीनंतर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया म्हणाले...,

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांची आज भेट घेतली.
Eknath Shinde Meet MNS Raj Thackeray
Eknath Shinde Meet MNS Raj Thackeray Saam Tv
Published On

मुंबई : राज्यात सत्तांतर झाल्यानंतर प्रथमच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज भेट घेतली. या भेटीत त्यांनी राज यांच्यासोबत जवळपास 40 मिनिटं चर्चा केली. राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवास्थानी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पोहचले होते. अचानक एकनाथ शिंदे हे राज ठाकरेंच्या भेटीला पोहचल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं होतं. दरम्यान, राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या भेटीनंतर एकनाथ शिंदे यांनी माध्यमांना आपली प्रतिक्रिया दिली आहे. (Eknath Shinde Meet MNS Raj Thackeray)

Eknath Shinde Meet MNS Raj Thackeray
Eknath Khadse : हे गणपती बाप्पा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना सदबुध्दी दे.., खडसेंचं गणरायाकडे साकडं

काय म्हणाले एकनाथ शिंदे?

सगळीकडे गणरायाचं आगमन झालं आहे, राज्यात उत्सावाच आनंदाचं वातावरण आहे. त्यामुळे गणेशोत्सवानिमित्त आज मी गणपतीच्या दर्शनासाठी राज ठाकरे साहेबांच्या घरी आलो, गणरायाचं दर्शन घेतलं बाकी काहीच चर्चा झाली नाही. असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांच्यावर शस्त्रक्रिया झाली होती. त्यामुळे मी त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी आले होतो. ही एक सदिच्छा भेट होती, याशिवाय मला शिवतीर्थावरील गणपतीचं दर्शनही घ्यायचं होतं, असंही एकनाथ शिंदे म्हणाले.

दरम्यान, यंदाचा गणेशोत्सव हा येणाऱ्या राजकीय नवीन समीकरणाची नांदी ठरणार का? असा प्रश्न पत्रकारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारला. यावर उत्तर देताना शिंदे म्हणाले की, आमची राजकीय चर्चा झालीच नाही, त्यामुळे नांदी कशी ठरेल आणि समीकरणं काय? असं म्हणत त्यांनी या विषयावर बोलणं टाळलं.

Eknath Shinde Meet MNS Raj Thackeray
१५ दिवसात भूमिका स्पष्ट करा अन्यथा...; मराठा क्रांती मोर्चाचा शिंदे-फडणवीस सरकारला इशारा

शिवसेनेतून उठाव केल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्यासमोर मोठा न्यायालयीन लढा उभा राहिला आहे. शिवसेना कुणाची हे प्रकरण सुप्रीम कोर्टात गेलं आहे. या संघर्षादरम्यानच भाजप आणि शिंदे गटाने एकत्र येत सत्तास्थापन केली.

काही दिवसांपूर्वी शिंदे गटावर जर विलिनीकरण करण्याची वेळ आली तर ते मनसेत विलीन होऊ शकतात अशी चर्चा रंगली होती. मात्र, त्यावेळी मनसे नेत्यांनी याबाबत भूमिका स्पष्ट केली नव्हती. त्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com