Chandrashekhar Bavankule: 'टिळकांना उमेदवारी देतो, निवडणूक बिनविरोध करा', बावनकुळेंचं काँग्रेसला आवाहन

Chandrashekhar Bawankule News: टिळक परिवाराला उमेदवारी द्यायला आम्ही तयार आहोत असे बावनकुळे यांनी यावेळी स्पष्ट केले.
Chandrashekhar Bavankule
Chandrashekhar Bavankulesaam tv
Published On

Kasba Bypoll: पुण्यातील कसबा विधानसभा पोटनिवडणूक चांगलीच रंगतदार बनत चालली आहे. काँग्रेस आणि भाजपने आज आपापल्या उमेदवारांचे जोरदार शक्तिप्रदर्शन करत अर्ज दाखल केले. त्यानंतर आता भाजपकडून कसब्याची निवडणूक बिनविरोध करण्याचे आवाहान काँग्रेसला करण्यात आले आहे.

उद्या उमेदवारी मागे घ्या - बावनकुळे

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज काँग्रेसला निवडणूक बिविरोध करण्याचे आवाहन केले आहे. निवडणूक बिनविरोध करण्यासाठी काँग्रेसने पुढाकार घेण्याची गरज असल्याचं मत चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले आहे. आम्ही टिळकांना उमेदवारी देतो, तुम्ही निवडणूक बिनविरोध करा, असे आवाहन करताना बावनकुळे यांनी काँग्रेला उद्या दुपारर्यंत उमेदवारी अर्ज मागे घावी असे म्हटले आहे.

Chandrashekhar Bavankule
Sushma Andhare News : एकनाथ शिंदे यांनी शिवसेना संपविण्याचा घाट घातलाय; सुषमा अंधारे यांचा गंभीर आरोप

कोणीही नाराज नाही, बावनकुळेंचा दावा

शैलेशजी आणि कुणालजी २ तारखेला माझ्याकडे जी-२० साठी आले होते. टिळक कुटुंबीय कधीच नाराज होऊ शकत नाही. मुक्तता ताई आमच्या नेत्या होत्या. लोकं कल्लोळ करत आहेत की टिळक कुटुंबीय नाराज आहे, पण कोणीही नाराज नाही असा दावा बावनकुळे यांनी केला आहे. (Latest Marathi News)

रासने यांची उमेदवारी मागे घेऊ - बावनकुळे

पक्षामध्ये कधीही जाणीवपूर्वक कोणालाही डावलण्यात येत नाही. कुणाल, बीडकर, घाटे हे सगळे उमेदवार क्षमता अससेले आहेत, पण एका जागेवर एकच जण लढू शकतो. काही गोष्टींचे मेरिट असते. उद्या ३ वाजेपर्यंत महाविकास आघाडीने ही निवडणूक बिनविरोध केली तर, आम्ही उद्या रासने यांची उमेदवारी मागे घेऊ असे बावनकुळे म्हणाले.

Chandrashekhar Bavankule
Belgaum : भाजपची बेळगावमध्ये मोठी राजकीय खेळी; पालिकेत बसवला मराठी महापौर

टिळक कुटूंबाला उमेदवारी देऊ - बावनकुळे

नाना पटोले यांना विनंती आहे की उद्या निवडणूक लादू नये. मागच्या वेळेस पवार साहेब यांच्यासह सर्व इतर नेते म्हणाले म्हणून आम्ही अंधेरीची निवडणूक बिनविरोध केली. आमचे कागदपत्र तयार आहेत, फॉर्म तयार आहेत. टिळक परिवाराला उमेदवारी द्यायला आम्ही तयार आहोत, असे बावनकुळे यांनी यावेळी स्पष्ट केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com