चंद्रकांत पाटलांचा पुण्यात मोठा खुलासा; म्हणाले, सरकार आणण्यासाठी आम्ही अडीच वर्ष...

मला ज्या मिशनसाठी पुण्याला पाठवलं ते मिशन सुरु करायचं आहे - चंद्रकांत पाटील
Chandrakant Patil
Chandrakant Patil Saam TV

ज्ञानेश्वर हिंगोलीकर -

पुणे: दोन अडीच वर्ष मी म्हणत होतो की, आपलं सरकार येणार, मी वेडा नव्हतो, मला माहिती होतं की आपलं सरकार येणार आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांचं मनोबल वाढवण्याचा प्रयत्न करत होतो. अडीच वर्ष खरंच आम्ही सरकार आणण्यासाठी प्लॅनिंग करत होतो असं वक्तव्य भाजप नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil ) यांनी केलं आहे.

पुणे (Pune) जिल्ह्याचे पालकमंत्री झाल्यानंतर पुणे भाजपाकडून (BJP) पाटील यांचा सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमात ते बोलत होते. पाटील पुढे म्हणाले, अशा सत्कार करण्यात आपण वेळ आणि पैसा घालवतो म्हणुन मी तो टाळत होतो.

पण तुमच मन जपण्यासाठी मी आलो, पुणे महापालिका आणि इतर निवडणुकांसाठी हा कार्यक्रम उपयोगी पडेल म्हणून मी आलो. देवाला देखील स्तुती आवडते, मी तर माणूस आहे. मी सदैव तुमचा ऋणी राहीन.

पाहा व्हिडीओ -

आपण अडीच वर्ष आपण खुप भोगलं, विरोधी पक्षाने आपल्याला खुप त्रास दिला. २०२४ ते २०१९ मध्ये देवेंद्र फडणवीस यांनी जे प्रकल्प आणले ते रद्द करण्याच काम मागील सरकारनं केलं. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे मेट्रो प्रकल्प आहे. (Metro project)

मागील दोन अडीच वर्ष मी म्हणत होतो की, आपलं सरकार येणार कारण मला माहिती होत की आपलं सरकार येणार आहे. त्यासाठी मी कार्यकर्त्यांचं मनोबल वाढवण्याचा प्रयत्न करत होतो. अडीच वर्ष खरंच आम्ही सरकार आणण्यासाठी प्लॅनिंग करत होतो.

मध्यप्रदेश आणि कर्नाटकमध्ये आपले सरकार आधी आलं नाही, पण आपण आणलं म्हणून त्याच्यासाठी वेळ लागत होता. आपण टाइमिंग साधला आणि आपले सरकार आलं असा मोठा खुलासा चंद्रकांत पाटील यांनी या कार्यक्रमात बोलताना केला.

आगामी काळात पद असूद्या किंवा निधी सगळं मिळणार, शहराच्या विकासाला कधीही निधी कमी पडू देणार नाही. तो विकास तुमच्या माध्यमातून झाला पाहिजे. मी आता आठवड्यातले तीन दिवस पुण्यात असणार आहे. या तीन दिवसांपैकी एक दिवस पूर्ण संध्याकाळ मी एका मंडळाला देणार, आणि संध्याकाळी एखाद्या कार्यकर्त्यांच्या घरी जेवण करूनच मी पुढे निघणार असल्याचंही पाटील यांनी सांगितलं.

Chandrakant Patil
उद्धव ठाकरेंनी मोदी-शहांवर केलेल्या टीकेला भाजपचं प्रत्युत्तर; म्हणाले, बुडत्याचा...

मला 2019 मध्ये अनेकांनी पुण्यात आलो तेव्हा नाव ठेवली, मी लक्ष देत नाही. सगळे म्हणाले बाहेरचा आला बाहेरचा आला, हा सगळा गेम आहे. माझ्यावर टीका करणाऱ्यांची तुम्हीं काही काळजी करु नका. मला उचललं आणि पुण्याला आणलं असं होत नाही. दिल्लीत या गोष्टीचा विचार केला गेला होता.

कोविडमुळे आणि आपलं सरकार गेल्यामुळे एक काम अर्धवट राहिलं आहे. येणाऱ्या काळात आपल्याला ते काम पूर्ण करायचा आहे ज्यासाठी मला पुण्यात पाठवला आहे. मला ज्या मिशनसाठी पुण्याला पाठवलं ते मिशन सुरु करायचं असल्याचं देखील पाटील म्हणाले. त्यामुळे नक्की भाजपचं पुण्यात काय मिशन आहे याबाबत आता तर्क वितक्र लढविले जात आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com