उद्धव ठाकरेंनी मोदी-शहांवर केलेल्या टीकेला भाजपचं प्रत्युत्तर; म्हणाले, बुडत्याचा...

उद्धव ठाकरे यांनी राजकीय संस्कृती संपवली आहे. तुम्ही मुख्यमंत्री असताना मुलाला मंत्री करण्याची गरज होती का ?
Uddhav Thackeray Dasara Melava
Uddhav Thackeray Dasara MelavaSaam TV
Published On

मुंबई: उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) भाजपचा पोटशूळ आहे, म्हणूनच ते त्यामधून बाहेर येत नाहीत. भाजपशिवाय ते काहीच बोलत नाहीत. गद्दारी कोणी केली यावर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी भाष्य केलेलं आहे. महाराष्ट्रातल्या जनतेशी ठाकरेंच गद्दारी केली आहे असं म्हणत भाजप नेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.

तसंच देशातली जनता पंतप्रधानांना (Narendra Modi) नेहमी डोक्यावर घेते. गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी कलम 370 रद्द केल त्यावर काही बोलले नाहीत, अशा शब्दात दरेकर यांनी कालच्या दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी मोदी-शहांवर केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिलं.

पाहा व्हिडीओ -

तर दिवाळीच्या तोंडावर 100 रुपयात जर गोष्टी मिळत असतील तर त्यावरती नाना पटोले का आक्षेप घेतायत, पोपटपंची करण्याच्या पलीकडे काहीही करू शकत नाहीत अशी बोचरी टीकाही दरेकर यांनी पटोलेंवर केली.

दरम्यान, कालच्या मेळाव्यासाठी १० कोटी रुपयांचा खर्च केल्याच्या आरोपांवरती बोलताना दरेकर म्हणाले, याप्रकरणाची चौकशी लावा, तुम्ही गर्दी जमवू शकला नाहीत म्हणून आता या गोष्टी उकरून काढण्यात काहीही अर्थ नाही. तुमच्या गर्दीपेक्षा शिंदेच्या सभेला चार पटीने गर्दी झाली होती अशी टीकाही त्यांनी ठाकरे गटावर केली.

Uddhav Thackeray Dasara Melava
Shivsena Dasara Melava: दसरा मेळाव्यात कोणाचा आवाज मोठ्याने घुमला, ठाकरे की शिंदे? अहवाल आला समोर

तर काल उद्धव ठाकरे यांनी श्रीकांत शिंदेवर (Shrikant Shinde) केलेल्या टीकेवर बोलताना दरेकर म्हणाले, विनाशकाले विपरीत बुद्धी, बुडत्याचा पाय खोलात असतो. उद्धव ठाकरे यांनी राजकीय संस्कृती संपवली आहे. ते मुख्यमंत्री असताना मुलाला मंत्री करण्याची गरज होती का ? तुम्ही केलेलं कृत्य विसरून दुसऱ्यावर काय आरोप करता अशा शब्दात त्यांनी ठाकरेंवर निशाणा साधला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com