
मुंबई : चांदिवाल आयोगासमोर (Chandiwal Commission) आज माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे वकिल उपस्थित नसल्यामुळे सुनावनी उद्या २२ डिसेंबर रोजी दुपारी १२:३० वा ठेवली आहे. या दरम्यान अनिल देशमुख यांना आयोगाने ५० हजाराचा दंड ठोठावला असून तो दंड मुख्यमंत्री सहायत्ता निधीमध्ये जमा करण्याचे आदेश दिले आहेत. या पूर्वी देखील देशमुखांना १५ हजार रुपयांचा दंड आयोगाने ठोठावलेला आहे. १०० कोटी वसुली प्रकरणात अनिल देशमुखांची चांदिवाल आयोगासमोर चौकशी सुरु आहे. मागच्या सुनावणीच्या वेळी सचिन वाझेने खळबळजनक उत्तरं दिली होती.
दरम्यान १०० कोटी खंडणीप्रकरणात राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) याच्याकडून किंवा त्याच्या निकटवर्तीयांकडून कुठल्याही प्रकारे पैशांची मागणी करण्यात आली नसल्याचे खळबळजनक उत्तर सचिन वाझे याने चांदिवाल आयोगासमोर दिले होते. चांदिवाल आयोगासमोर अनिल देशमुख आणि सचिन वाझे (Sachin Vaze) याला समोरासमोर बसवून प्रश्न विचारण्यात आले. तेव्हा सचिन वाझे याने आपण अनिल देशमुख यांना कधीही पैसे दिले नसल्याचे स्पष्ट केले. तसेच आपण अनिल देशमुख यांच्या कोणत्याही सहकाऱ्यांनाही पैसे दिले नसल्याचे वाझे याने सांगितले. त्यामुळे याप्रकरणात अनिल देशमुख यांच्यावरील आरोप निकालात निघण्याची शक्यता वाढली होती.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Param Bir Singh) यांनीही आपल्या पत्रात या दोघांच्या माध्यमातून खंडणी गोळा केली जात असल्याचा आरोप केला होता. यात ईडीने स्वतंत्र तपास करत अनिल देशमुख यांचे खासगी सहाय्यक कुंदन शिंदे आणि संजीव पालांडे यांनाही अटक केली होती. पाठोपाठ ईडीनेही मनीलाँड्रीग प्रकरणात अनिल देशमुख यांना अटक केली. मात्र, काही दिवसांपूर्वीच परमबीर सिंग यांनी आपल्याकडे तसे कोणतेही पुरावे नसल्याचे म्हटले होते. त्यापाठोपाठ आता सचिन वाझे यानेही आपण अनिल देशमुख यांना आपण कोणतेही पैसे दिले नसल्याची कबुली दिली आहे. वाझेची आज पुढील सुनावणी होती परंतु ती उद्यावर ढकलण्यात आली आहे.
Edited By: Pravin Dhamale
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.