10 देवस्थान जमीन घोटाळा प्रकरणात भाजपचे 2 आमदार; मलिकांनी दिले पुरावे

रामाच्या नावाने राजकारण करणारे भाजपने जमीन घोटाळा केला आहे.
10 देवस्थान जमीन घोटाळा प्रकरणात भाजपचे 2 आमदार; मलिकांनी दिले पुरावे
10 देवस्थान जमीन घोटाळा प्रकरणात भाजपचे 2 आमदार; मलिकांनी दिले पुरावेSaam TV
Published On

मुंबई : राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी आज बीड जिल्ह्यातील (Beed District) जमीन घोटाळा प्रकरणी गंभीर आरोप केले आहेत. मध्यंतरी इडीने वक्फ बोर्डाच्या कार्यालयावर छापे मारल्याच्या बातम्या आल्या होत्या. त्यावर स्पष्टीकरण देताना मलिक म्हणाले मी वक्फ बोर्डाच्या कार्यालयावर छापेमारी झाली नाही हे स्पष्ट केले होते. महाराष्ट्रात बोर्डाच्या माध्यमातून 11 FRI दाखल केले. देगलूर दर्गा, नांदेड येथील FRI दाखल करण्यात आला. पैठण येथील दर्गा मौलाना FRI दाखल करण्यात आले. वकील असीम सरोदे यांनी भाजपचे आमदार सुरेश धस यांच्यावर जमीनी हडपल्या प्रखरणी आरोप केले होते.

10 देवस्थान जमीन घोटाळा प्रकरणात भाजपचे 2 आमदार; मलिकांनी दिले पुरावे
वडीलांची इच्छापुर्ती! किराणा दुकानदाराच्या मुलाची थेट भारतीय संघात निवड

बीड जिल्ह्यात जमीनींचा घोटाळा...

आष्टी मध्ये 3 दर्गा आणि मज्जीद जागेवर बेकायदेशीर नोंद करत विक्री करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप मलिक यांनी केला आहे. आष्टी मधील 10 देवस्थानांमध्ये घोटाळा समोर आणला आहे. यामध्ये 7 हिंदू देवस्थानांच्या जमिनींचा समावेश आहे. मंदिरांच्या जागेचा खालसा करण्याचे काम आष्टीमध्ये झाले आहे. हिंदू देवस्थानाची 300 एकर जमीन खालसा करण्याचा प्रयत्न अधिकाऱ्यांच्या मदतीने झाला असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेमधून केला आहे.

2017 ला डेप्युटी कलेक्टर एन आर शेळके असतांना ह्या जमीनी हडपण्याचा प्रयत्न झाला आहे. दोन FIR दाखल करण्यात आल्यावर SIT ची नेमणूक करण्यात आली होती. SIT ने वक्फच्या जमिनीच्या प्रकरणाची ही चौकशी करावी अशी मागणी आम्ही केली आहे. 7 हिंदु देवस्थान जमीन बळकावल्या प्रकरणी तक्रार देखील करण्यात आली आहे अशी माहिती नवाब मलिक यांनी दिली आहे.

10 देवस्थान जमीन घोटाळा प्रकरणात भाजपचे 2 आमदार; मलिकांनी दिले पुरावे
IND vs SA: सामन्यापुर्वी माशी शिंकली; मोठी अपडेट आली समोर

भाजपच्या दोन आमदारांची नावं जाहीर

भाजपचे आमदार सुरेश धस यांचे ईडी कडे झालेल्या तक्रारीत नाव आहे. आष्टी येथील माजी आमदार भीमराव धोंडे यांचे देखील नाव ही ईडीकडे केलेल्या तक्रारीत आहे. रामाच्या नावाने राजकारण करणारे भाजपने जमीन घोटाळा केला आहे. देवस्थानाची जमीनत घोटाळा करण्याचा प्रकार झाला आहे. वक्फ बोर्डाच्या बाबतीत तक्रारी दाखल होत आहेत त्यांची चौकशी व्हावी गुन्हा दाखल व्हावा अशी आमची मागणी असल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले. एकून घोटाळा हा 513 एकर जमिनीचा करण्यात आल्याचं मलिकांनी सांगितले आहे.

या मंदिराच्या जागेत घोटाळा...

विठोबा मंदिर ट्रस्ट, खंडोबा मंदिर ट्रस्ट, राम मंदिर ट्रस्ट याठिकाणी जमिनीचा घोटाळा करण्यात आला आहे. सेवा जमिनीचा मदत जमीन म्हणून उल्लेख करत शेळके यांनी हा प्रकार केला आहे. 300 एकर जमीन मंदिर आणि 213 एकर जमीन मस्जिद जमिनीचा घोटाळा करण्यात आला आहे. गृह मंत्री, महसूल मंत्री, ईडी यांच्याकडे याबाबत तक्रार करण्यात आली असल्याचं मलिकांनी सांगितले आहे. ईडी यासंबंधी चौकशी असा विश्वास देखील आम्हाला आहे असे मलिक म्हणाले.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com