
वेस्ट-इंडीजमध्ये पुढच्या महिन्यात होणाऱ्या 19 वर्षाखालील विश्वचषकासाठी भारतीय संघाची निवड झाली आहे. या संघाची धूरा दिल्लीचा खेळाडू यश ढुलच्या खांद्यावर दिली आहे. त्याचबरोबर या अनेक खेळाडू असे आहेत ज्यांनी प्रचंड मेहनत करुन संघात आपले स्थान निश्वित केले आहे. कर्णधार यश व्यतिरीक्त गाजियाबादच्या सिद्धार्थ यादवने (Siddharth Yadav) देखील मोठा संघर्ष करुन संघात आपली जागा पक्की केली आहे.
गाजियाबादच्या कोटगावमध्ये सिद्धार्थचे वडील एक किराणा दुकान चालवतात. सिद्धार्थचे वडील श्रवण यादव यांची देखील क्रिकेटर बनण्याची मनापासून इच्छा होती परंतु ते नेट बॉलरच्या पुढे जाऊ शकले नाहीत.आता त्यांचा मुलगा सिद्धार्थ वडीलांचं स्वप्न पुर्ण करण्यासाठी युएईमध्ये आशिया कप आणि वेस्ट-इंडीजमध्ये (West-Indies) अंडर-19 विश्वचषक खेळणार आहे.
डावखूऱ्या हाताचा फलंदाज असलेल्या सिद्धार्थच्या वडीलांची पहिल्यापासूनच इच्छा होती की मुलाने क्रिकेटर (Cricketer) बनावे. वडील श्रवण म्हणाले की जेव्हा पहिल्यांदा सिद्धार्थने बॅट हातात घेतली होेती तेव्हाच मला वाटले होते की तो एक चांगला डावखूरा हाताचा फलंदाज बनणार आहे. आणि तिच भविष्यवाणी सिद्धार्थने खरी करुन दाखवली. त्याने खूप मेहनत केली आणि आज तो भारताच्या अंडर- 19 संघाचा भाग आहे.
8 व्या वर्षापासून सिद्धार्थने आपली मेहनत डबल केली, आणि याच मेहनतीच्या जोरावर त्याने भारतीय संघात स्थान मिळवले. सिद्धार्थचे वडील श्रवण म्हणाले की सुरवातीला मी रोज 3 तास दुकान बंद करुन त्याचा सराव घेत असे. सुरवातीच्या काही काळात सिद्धार्थच्या वडीलांनी सिद्धार्थवर प्रचंड मेहनत घेतली कारण त्यांचं क्रिकेटर होण्याचं स्वप्न मुलगा सिद्धार्थ पुर्ण करणार होता.
प्रत्येक लहान शहरातील क्रिकेटपटूच्या मागे मोठा संघर्ष असतो. सिद्धार्थ यादवसोबत या संघात असे अनेक खेळाडू आहेत ज्यांना छोट्या शहरांमधून बाहेर पडून नवीन स्थान मिळवायचे आहे. पुढील महिन्यापासून वेस्ट इंडिजमध्ये अंडर-19 विश्वचषक खेळवला जाणार आहे. या खेळाडूंकडून पुन्हा एकदा विश्वचषक जिंकावा, अशी संपूर्ण देशाची अपेक्षा आहे. 2020 मध्ये भारतीय संघ बांगलादेशविरुद्ध फायनलमध्ये पराभूत झाला होता. यापूर्वी 2018 मध्ये भारताने न्यूझीलंडमध्ये चौथ्यांदा अंडर-19 विश्वचषक जिंकला होता.
Edited By: Pravin Dhamale
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.