

मुंबई-पुण्यादरम्यानचा रेल्वे (Mumbai- Pune Railway) प्रवास वेगवान आणि आरमदायी होणार आहे. मुंबई आणि पुणे या दोन शहरांना जोडण्यासाठी कर्जत ते तळेगाव आणि कर्जत ते कामशेत हे दोन नवे मार्ग तयार करण्यासाठीचा प्रस्ताव आहे. या नव्या मार्गामुळे लोणावळा घाट टाळून पुणे गाठता येणार आहे. हा नवा मार्ग तयार झाल्यानंतर मुंबई-पुणे रेल्वे प्रवासाच्या वेळेत अर्धा तासाची बचत होणार आहे. म्हणजे जर मुंबईवरून पुण्याला पोहचायला ३ तास लागत असतील तर नव्या मार्गामुळे फक्त अडीच तासांत पुण्यामध्ये पोहचता येणार आहे. यासोबत १० अतिरिक्त रेल्वेगाड्या देखील सुरू करण्यात येतील.
दरम्यान, आताच्या मार्गावर पर्वत रांगा आहेत. पर्वत रांगाना वळसा घालावे लागत असल्यामुळे अंतर हे जास्त आहे. पण आता नव्या मार्गामुळे घाट टाळता येणार आहे. घाट टळल्यामुळे एक्स्प्रेसचा वेग दुप्पट होणार आहे. म्हणजे रेल्वे ११० किमी प्रतितास वेगाने धावणार आहेत. त्यामुळे प्रवासाच्या वेळेमध्ये अर्धा तासाची बचत होणार आहे. शिवाय नव्या १० रेल्वेगाड्या चालवण्याचा पर्याय देखील मध्य रेल्वेकडून खुला करण्यात आला आहे.
मध्य रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, प्रस्तावित ट्रॅक सध्याच्या ट्रॅकच्या पूर्वेला असतील आणि ते लोणावळ्याला बायपास करतील. सध्याच्या संरेखनामध्ये १|३७ चा तीव्र ग्रेडियंट आहे. ज्यासाठी अतिरिक्त लोकमोटिव्ह आवश्यक आहेत. नवीन संरेखनामध्ये सौम्य ग्रेडियंट असतील. कमी झालेल्या ग्रेडियंटमुळे रेल्वेगाड्या ताशी ११० किमी वेगाने धावतील.' महत्वाचे म्हणजे, कल्याण यार्डचे काम पूर्ण झाल्यानंतर आणि पनवेल आणि एलटीटी रेल्वे स्थानकावरील नवीन प्लॅटफॉर्मचे काम पूर्ण झाल्यानंतर मध्य रेल्वे गाड्यांची संख्या १० ने वाढवू शकतील.', असे देखील या अधिकाऱ्याने सांगितले.
- मुंबई- पुणेदरम्यान रेल्वे मार्गात लोणावळा-खंडाळा घाट आहे.
- प्रवासी सुरक्षिततेसाठी घाटात रेल्वेची ताश ६० किमी वेगमर्यादा आहे.
- नव्या मार्गावर घाट नसल्यामुळे रेल्वे ताशी ११० किमी वेगाने धावणार आहे.
- कर्जत ते तळेगाव आणि कर्जत ते कामशेत या दोन मार्गांचा प्रस्ताव आहे.
- यापैकी एक मार्ग मंजूर झाल्यावर ४ वर्षांत काम पूर्ण होण्याची शक्यता आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.