रेल्वेतील फुकटे प्रवासी वाढले; मध्य रेल्वेने केला कोटींचा दंड वसूल

मध्य रेल्वेने (Central Railway) पहिल्या तिमाहीत म्हणजेच एप्रिल-जून २०२२ मध्ये फुकट्या प्रवाशांकडून १०३.३९ कोटी रुपयांचा दंड वसुल केला आहे.
Central Railway
Central Railway saam tv
Published On

सुमित सावंत

मुंबई : मध्य रेल्वेने (Central Railway) पहिल्या तिमाहीत म्हणजेच एप्रिल-जून २०२२ मध्ये फुकट्या प्रवाशांकडून १०३.३९ कोटी रुपयांचा दंड वसुल केला आहे. फुकट्या प्रवाशांना रोखण्यासाठी मध्य रेल्वेकडून सदर कारवाई केली जात आहे. या कारवाईमुळे मध्य रेल्वेत (Railway) फुकट्या प्रवाशांचे प्रमाण लक्षणीय असल्याची बाब समोर आली आहे. विनातिकीट प्रवास आणि अशा इतर अनियमिततेमुळे फुकट्या प्रवाशांकडून जमा होणाऱ्या महसुलावर वरिष्ठ अधिकारी बारकाईने लक्ष ठेवून आहेत. ( Central Railway News In Marathi )

Central Railway
अमरावतीची घटना म्हणजे महाविकास आघाडीचं पाप, खासदार अनिल बोंडेंचा घणाघात

मध्य रेल्वेच्या तिकीट तपासणी पथकाने फुकट्या प्रवाशांकडून एप्रिल-जून २०२२ या पहिल्या तिमाहीत रु.१०३.३९ कोटी रुपयांचा विक्रमी तिकीट (Ticket) तपासणी महसूल जमा केला आहे. जून-२०२२ या महिन्यात, मध्य रेल्वेने बुक न केलेल्या सामानासह विनातिकीट/अनियमित प्रवासाच्या ४.८३ लाख प्रकरणांद्वारे ३१.७८ कोटींचा महसूल नोंदवला आहे. एप्रिल-जून २०२२ या पहिल्या तिमाहीत, विनातिकीट/अनियमित प्रवास आणि बुक न केलेल्या सामानाची एकूण १४.९४ लाख प्रकरणे आढळून आली आहेत, तर मागील वर्षी याच कालावधीत ५.०४ लाख प्रकरणे आढळून आली असून त्यात १९६.३२% ची वाढ दिसून आली आहे.

Central Railway
बंडखोरांना हॉटेलबाहेर पडण्यासाठी घ्यावी लागतेय परवानगी, गुलाबराव हे काय सांगून गेले?

विनातिकीट/अनियमित प्रवासातून प्राप्त झालेल्या महसुलात पहिल्या तिमाहीत म्हणजेच एप्रिल-जून २०२२ साठी रु.१०३.३९ कोटी नोंदवले गेले आहेत, जे मागील वर्षीच्या याच कालावधीत नोंदवलेल्या रु.३१.५८ कोटी महसुलाच्या तुलनेत २२७.४०% ची वाढ दर्शवतात. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी आणि सन्मानाने प्रवास करण्यासाठी प्रवाशांना योग्य आणि वैध रेल्वे तिकीट घेऊन प्रवास करण्याचे आवाहन मध्य रेल्वेकडून करण्यात येत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com