Without Ticket Fine : मध्य रेल्वेचा ९ लाख फुकट्या प्रवाशांना दणका; दोन महिन्यांत तब्बल ६३ कोटींचा दंड वसूल

Indian Railways Penalty for Passengers : मागील दोन महिन्यात रेल्वेने ९ लाख फुकटे प्रवासी पकडले आहेत. त्यांच्याकडून तब्बल ६३ कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
मध्य रेल्वेचा ९ लाख फुकट्या प्रवाशांना दणका; दोन महिन्यांत तब्बल ६३ कोटींचा दंड वसूल
Indian Railways Penalty for PassengersSaam TV
Published On

मध्य रेल्वेने विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. रेल्वेस्थानक तसेच प्लॅटफॉर्मवर सध्या विशेष तिकीट तपासणी मोहिम सुरू आहे. मागील दोन महिन्यात रेल्वेने ९ लाख फुकटे प्रवासी पकडले आहेत. त्यांच्याकडून तब्बल ६३ कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे विनातिकीट प्रवास करणाऱ्यांचे चांगलेच धाबे दणादणले आहेत.

मध्य रेल्वेचा ९ लाख फुकट्या प्रवाशांना दणका; दोन महिन्यांत तब्बल ६३ कोटींचा दंड वसूल
Mumbai Local Mega Block: रविवारी मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक, वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडा

धक्कादायक बाब म्हणजे, यातील ४.०७ लाख प्रवासी एकट्या मुंबई विभागातील आहेत. त्यांच्याकडून जवळपास २५.०१ कोटी रुपयांची दंड वसुली करण्यात आली आहे. यामध्ये जनरलचे तिकीट काढून स्लीपर तसेच एसी कोचमधून प्रवास करणाऱ्यांचा देखील मठ्या प्रमाणात समावेश आहे. मागील काही दिवसांपासून रेल्वेने विनातिकीट प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढली आहे.

या प्रवाशांमुळे तिकीटधारक प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. यासंदर्भात अनेक तक्रारी देखील प्राप्त झाल्या आहेत. विनातिकीट प्रवाशांमुळे होणारे मध्य रेल्वेचे उत्पन्न घटल्याचं समोर आलं आहे. हीच बाब लक्षात घेता विशेष तिकीट तपासणी मोहिम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेत एप्रिल आणि मे या दोन महिन्यांदरम्यान एकून ९.०४ लाख विनातिकीट प्रवास करणारे प्रवासी पकडण्यात आले आहेत.

या प्रवाशांना रेल्वेने चांगलाच दणका दिला असून त्यांच्याकडून एकूण ६३.६२ कोटी रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. यामध्ये ४.०७ लाख प्रवासी एकट्या मुंबई विभागातील आहेत. तर भुसावळ विभागात १.९३ लाख विनातिकीट प्रवासी पकडण्यात आले आहेत.

याशिवाय नागपूर विभागातील १.१९ लाख, सोलापूर विभागातील ५४.०७ हजार आणि पुणे विभागातील ८३.१० हजार हजार विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर कारवाई करण्यात आली आहे. या सर्व प्रवाशांकडून एकूण ६३.६२ कोटींचा दंड वसूल करण्यात आला आहे. ही मोहिम यापुढेही सुरू राहणार असल्याचं रेल्वेच्या वतीने सांगण्यात आलं आहे.

मध्य रेल्वेचा ९ लाख फुकट्या प्रवाशांना दणका; दोन महिन्यांत तब्बल ६३ कोटींचा दंड वसूल
Weather Forecast : मुंबईसह राज्यातील 'या' भागात आज मुसळधार पावसाचा इशारा; IMD कडून अनेक जिल्ह्यांना अलर्ट

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com