मुंबईत रविवारी मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक; जाणून घ्या रेल्वेचे वेळापत्रक

Mega Block News : मध्य रेल्वेवर येत्या रविवारी विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी उपनगरीय विभागांवर मेगाब्लॉक
Central Railway and harbour line Mega Block on sunday
Central Railway and harbour line Mega Block on sundaySaam Tv
Published On

मुंबई : मध्य रेल्वेवर (Central Railway) येत्या रविवारी विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी उपनगरीय विभागांवर मेगाब्लॉक (Mega Block) घेण्यात येणार आहे. सदर ब्लॉक हा माटुंगा - मुलुंड अप आणि डाउन धीम्या मार्गावर घेण्यात येईल. हा ब्लॉक सकाळी ११.०५ ते दुपारी ४.०५ वाजेच्या कालावधीत घेण्यात येईल. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी १०.१४ ते दुपारी ३.३२ या वेळेत सुटणाऱ्या उपनगरीय धीम्या गाड्या माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान डाउन जलद मार्गावर वळविण्यात येणार आहे. (Central Railway and harbour line Mega Block on sunday )

हे देखील पाहा -

रविवारी मेगाब्लॉक कालावधीत सीएसएमटी स्थानकावरून सकाळी १०.१४ ते दुपारी ३.३२ या वेळेत गाड्या शीव, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि मुलुंड स्थानकांवर थांबतील. त्यानंतर या गाड्या मुलुंड स्थानकापासून पुन्हा डाउन धीम्या मार्गावर वळविण्यात येतील. सदर गाड्यानियोजित वेळेच्या १५ मिनिटे उशिराने गंतव्यस्थानी पोहोचतील. ठाणे येथून सकाळी १०.५८ ते दुपारी ३.५९ पर्यंत सुटणाऱ्या अप धीम्या मार्गावरील उपनगरीय गाड्या मुलुंड स्थानकापासून अप जलद मार्गावर वळविण्यात येतील. तसेच मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला आणि शीव स्थानकांवर थांबून पुढे माटुंगा येथे अप धीम्या मार्गावर वळवल्या जातील. सदर गाड्या नियोजित वेळेच्या १५ मिनिटे उशिराने गंतव्यस्थानी पोहोचतील.

Central Railway and harbour line Mega Block on sunday
शरद पवारांना धमकीचं ट्विट; राष्ट्रवादीकडून सायबर सेलमध्ये तक्रार

हार्बर मार्गावर 'असा' असेल मेगाब्लॉक

रविवारी अप आणि डाउन हार्बर मार्गावर (Harbour Line) कुर्ला आणि वाशी स्थानकांदरम्यान मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.१० वाजेपर्यंत हा ब्लॉक कालावधी निश्चित करण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी १०.३४ ते दुपारी ३.५४ या वेळेत पनवेल/बेलापूर/वाशी करिता सुटणारी हार्बर मार्गावरील सेवा आणि पनवेल/बेलापूर/वाशी येथून सकाळी १०.१६ ते दुपारी ३.४७ या वेळेत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससाठी सुटणारी अप हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील.

दरम्यान, रविवारच्या या ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - कुर्ला - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि पनवेल - वाशी - पनवेल विभागादरम्यान विशेष सेवा चालविण्यात येणार आहे. त्यामुळे या ब्लॉक कालावधीत हार्बर मार्गावरील प्रवाशांना ठाणे- वाशी/नेरूळ स्थानकांतून सकाळी १०.०० ते सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत प्रवास करण्याची परवानगी आहे. सदर मेगाब्लॉक हा पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक आहेत. त्यामुळे होणार्‍या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाने दिलगिरी व्यक्त केली आहे.

Edited By - Vishal Gangurde

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com