Pune Metro: खुशखबर! पुणे मेट्रोच्या पिंपरी ते निगडीपर्यंत विस्ताराला केंद्राची मंजुरी, 33 स्थानके उभारली जाणार

Pimpri-Chinchwad To Nigdi: खुशखबर! पुणे मेट्रोच्या पिंपरी ते निगडीपर्यंत विस्ताराला केंद्राची मंजुरी, 33 स्थानके उभारली जाणार
Extension of Pune Metro from Pimpri-Chinchwad To Nigdi
Extension of Pune Metro from Pimpri-Chinchwad To NigdiSaam TV
Published On

Extension of Pune Metro from Pimpri-Chinchwad to Nigdi:

पुणे मेट्रोच्या पिंपरी ते निगडीपर्यंत विस्तारीकरणाला केंद्राने सोमवारी मंजुरी दिल्याने पिंपरी-चिंचवडवासीयांची अनेक वर्षांपासूनची मागणी पूर्ण होणार आहे. पिंपरी-चिंचवड महानगरपालिका (PCMC) ते निगडी पर्यंत पसरलेला हा मार्ग एकूण 4.413 किमी अंतर व्यापतो आणि त्यात चिंचवड, आकुर्डी आणि निगडी या तीन स्थानकांचा समावेश आहे.

या मार्गासाठी एकूण प्रकल्प खर्च 910.18 कोटी आहे आणि या विस्ताराचे काम तीन वर्षे आणि तीन महिन्यांत पूर्ण होणे अपेक्षित आहे. या मंजुरीमुळे पुणे मेट्रोचे जाळे एकूण 37.613 किमी लांबीपर्यंत विस्तारणार असून, 33 स्थानकांचा समावेश होणार आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Extension of Pune Metro from Pimpri-Chinchwad To Nigdi
Gujarat Bridge Collapse: गुजरातमध्ये पूल कोसळला, एकाचा मृत्यू; VIDEO आला समोर

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे मेट्रोचा स्वारगेट ते पीसीएमसी आणि पीसीएमसी ते निगडी असा विस्तार करण्याची मागणी केली जात होती. यासाठी पीसीएमसी ते निगडी या विस्तारित मार्गासाठी पुणे मेट्रोने सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार केला होता. पीसीएमसीकडून मंजुरी मिळाल्यानंतर हा प्रस्ताव राज्य आणि केंद्र सरकारकडे सादर करण्यात आला. सर्व तांत्रिक गरजा पूर्ण झाल्याची खात्री करून महामेट्रोने या प्रकल्पाचा पाठपुरावा केला. यानंतर सोमवारी केंद्र सरकारच्या गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्रालयाने याला अंतिम मंजुरी दिली.  (Latest Marathi News)

याबद्दल बोलताना महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर म्हणाले, "पीसीएमसी ते निगडी या मार्गाचा विस्तार करणे अत्यावश्यक आहे. यामुळे चिंचवड, आकुर्डी आणि निगडी हे मेट्रो नेटवर्कशी जोडले जातील. ज्यामुळे परिसरातील हजारो लोकांना फायदा होईल. वेळापत्रकानुसार 3 वर्षे आणि 3 महिन्यांत पूर्ण होणे अपेक्षित आहे.

Extension of Pune Metro from Pimpri-Chinchwad To Nigdi
Salary Hike: 'या' मोठ्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी मिळणार मोठं गिफ्ट, 1 नोव्हेंबरपासून वाढणार पगार

महत्त्वाचे मुद्दे:

- पीसीएमसी ते निगडी एकूण 4.413 किमी अंतर आहे.

- त्यात चिंचवड, आकुर्डी आणि निगडी या तीन स्थानकांचा समावेश आहे

- या मार्गासाठी एकूण प्रकल्प खर्च 910.18 कोटी आहे.

- तीन वर्षे आणि तीन महिन्यांत काम पूर्ण होणे अपेक्षित आहे.

- या विस्तारामुळे, पुणे मेट्रोचे जाळे एकूण 37.613 किमी लांबीपर्यंत विस्तारेल, त्यात 33 स्थानके समाविष्ट होतील.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com