पुणे - काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्या जावयाचा भाऊ रोहित शंकर काळभोर आणि व्याही शंकर नामदेव काळभोर यांच्या विरोधात पिंपरी पोलीस (Police) स्टेशनमध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाच्या आदेशावरून रोहित काळभोर आणि शंकर काळभोर विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पवन मनोहरलाल लोढा यांच्या तक्रारीवरून रोहित काळभोर आणि शंकर काळभोर विरोधात पिंपरी पोलीस स्टेशनमध्ये फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रोहित काळभोर आणि शंकर काळभोर यांनी मनोहरलाल लोढा यांच्या कंपनीचे बनावट सही, शिक्के तयार करून फसवणूक केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पवन मनोहरलाल लोढा यांची खराबवाडी, चाकण या ठिकाणी एक्सा एलाईज नावची कंपनी आहे.
हे देखील पहा -
या कंपनीला रोहित काळभोर आणि नामदेव काळभोर यांची कोहिनूर ट्रेंड होम ही कंपनी भंगार मालाचा पुरवठा करत होती. भंगार मालाचा पुरवठा करण्याच्या मोबदल्यात रोहित काळभोर आणि शंकर काळभोर यांनी पवन मनोहरलाल लोढा यांच्या एक्सा एलाईज कंपनीकडून जवळपास 78 लाख रुपयांचे काही अग्रिम चेक घेतले होते.
मात्र पवन मनोहरलाल लोढा यांच्या कंपनीच्या सहमती शिवाय रोहित काळभोर आणि शंकर काळभोर यांनी ते अग्रीम घेतलेले चेक बँकेत वटविण्यास लावले होते. मात्र, पवन मनोहरलाल लोढा यांनी बँकेकडे वेळीच तक्रार दाखल केल्याने ते चेक जमा होऊ शकले नाही. या प्रकरणात पवन मनोहरलाल लोढा यांनी न्यायालयात केलेल्या तक्रारीवरून पिंपरी पोलिसांनी अधिक तपास करून रोहित काळभोर आणि शंकर काळभोर विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
Edited By - Shivani Tichkule
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.