Cama Hospital : कामा रुग्णालयात ९ विभाग सुरू होणार; रुग्णांसोबत विद्यार्थ्यांना मिळणार या आरोग्य सुविधा?

Cama Hospital Medical Service : मुंबईतील गोकुळ दास तेजपाल वैद्यकीय महाविद्यालयाशी कामा रुग्णालय जोडण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यामुळे, कामा रुग्णालयात लवकरच नऊ विभाग सुरू होणार आहेत.
Cama Hospital
Cama HospitalSaam Digital
Published On

Cama Hospital

मुंबईतील गोकुळ दास तेजपाल वैद्यकीय महाविद्यालयाशी कामा रुग्णालय जोडण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यामुळे, कामा रुग्णालयात लवकरच नऊ विभाग सुरू होणार आहेत. त्यामुळे, कामा रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या महिला व बाल रुग्णांना नवीन आरोग्य सुविधा मिळणार आहेत. यासोबतच वैद्यकशास्त्र शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनाही याचा लाभ घेता येणार आहे.

राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागाने १०० एमबीबीएस विद्यार्थ्यांची क्षमता असलेले नवीन वैद्यकीय महाविद्यालय म्हणून जेजे रुग्णालय समूहांतर्गत जीटी रुग्णालय सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. वैद्यकीय महाविद्यालयांसाठी राष्ट्रीय वैद्यकीय विज्ञान आयोगाच्या मानकांची पूर्तता करण्यासाठी कामा रुग्णालय या वैद्यकीय महाविद्यालयाशी जोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी कामा हॉस्पिटल नवीन सुविधांनी सुसज्ज करण्यात येत आहे.

रुग्णांना फायदा होणार

कामा रुग्णालयात ॲनाटॉमी, फिजिओलॉजी, बायोकेमिस्ट्री, फॉरेन्सिक मेडिसिन, मायक्रोबायोलॉजी, फार्माकोलॉजी, डायग्नोस्टिक्स, गायनॅकॉलॉजी आणि पेडियाट्रिक्सचे नऊ नवीन विभाग सुरू करण्यात येणार आहेत. या विभागांसाठी आवश्यक विभागप्रमुख, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि इतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीची प्रक्रिया लवकरच सुरू करण्यात येणार आहे. वैद्यकीय महाविद्यालयाला राष्ट्रीय वैद्यकीय विज्ञान आयोगाची परवानगी मिळताच ही प्रक्रिया पूर्ण केली जाईल, असे कामा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.तुषार पालवे यांनी सांगितले.विभाग सुरू झाल्याने येथे अतिरिक्त डॉक्टरांची नियुक्ती करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. याचा थेट फायदा येथे येणाऱ्या रुग्णांना होणार आहे.

Cama Hospital
Mahabaleshwar Breaking News : महाबळेश्वरमधील मोठी दुर्घटना; तलावात पोहताना ३ मुली बुडाल्या

येथे महिला व बालकांवर उपचार होतात

कामा रुग्णालय हे महिला आणि बालकांच्या उपचारासाठी प्रसिद्ध आहे. या रुग्णालयात राज्याच्या कानाकोपऱ्यातून रुग्ण उपचारासाठी येतात. यासोबतच मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पनवेल, भिवंडी, पालघर, रायगड येथूनही मोठ्या प्रमाणात रुग्ण विविध आजारांवर उपचारासाठी येतात.

Cama Hospital
Dombivli News: शिवसेनेच्या माजी नगरसेवकांच्या नावाने व्यावसायिकांकडून उकळले पैसे, पोलिसात गुन्हा दाखल

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com