Mukesh Ambani Threat
Mukesh Ambani ThreatSaam TV

Mukesh Ambani Threat: उद्योगपती मुकेश अंबानी यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी; पोलिसांकडून चौकशी सुरू

Mukesh Ambani Threat: प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांना पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. धमकी देणाऱ्या व्यक्तीने मुकेश अंबानी यांच्याकडे 20 कोटी रुपयांची मागणी केली आहे.
Published on

Mukesh Ambani Death Threat

प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांना पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. धमकी देणाऱ्या व्यक्तीने मुकेश अंबानी यांच्याकडे २० कोटी रुपयांची मागणी केली आहे. जर पैसे दिले नाहीत, तर ठार मारू असं धमकी देणाऱ्या व्यक्तीने म्हटलं आहे. या घटनेनं मोठी खळबळ उडाली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Mukesh Ambani Threat
Mumbai Mega Block: मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी, रविवारी रेल्वेच्या 'या' मार्गांवर मेगाब्लॉक; पाहा वेळापत्रक

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार २७ ऑक्टोबर रोजी एका अज्ञात व्यक्तीने मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या ईमेल आयडीवर धमकीचा ईमेल पाठवला होता. “तुम्ही आम्हाला २० कोटी रुपये दिले नाहीत, तर आम्ही तुम्हाला मारून टाकू, आमच्याकडे भारतात सर्वोत्तम शूटर आहेत”, असं धमकी देणाऱ्या व्यक्तीने ई-मेलमध्ये म्हटलं होतं.

धमकीचा ई-मेल आल्यानंतर, मुकेश अंबानी यांच्या सुरक्षा प्रभारींनी पोलिसांत (Police) धाव घेतली. याप्रकरणी गावदेवी पोलिसांनी आयपीसीच्या कलम ३८७ आणि ५०६ (२) अंतर्गत अज्ञात व्यक्तीविरुद्ध एफआयआर नोंदवून तपास सुरू केला आहे.

दरम्यान, मुकेश अंबानी यांना जीवे मारण्याची धमकी आल्याची ही काही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी २०२२ मध्ये देखील त्यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली होती. धमकीनंतर पोलिसांनी अवघ्या ३ तासांतच आरोपीला अटक केली होती.

काही दिवसांपूर्वी नागपूर पोलिसांना देखील अज्ञात व्यक्तीने फोन करुन उद्योगपती मुकेश अंबानी, यांचे बंगले बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिली होती. या धमकीची पोलिसांनी गंभीर दखल घेतली होती. याप्रकरणी बिहार येथील एका व्यक्तीला अटक करण्यात आली होती.

Mukesh Ambani Threat
Rozgar Mela: पंतप्रधान मोदींकडून ५१ हजार तरुणांना मोठं गिफ्ट; आज सरकारी नोकऱ्यांसाठी नियुक्तीपत्र देणार

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com