राज्यात बुलेट ट्रेनचा मार्ग मोकळा; शिंदे सरकारकडून प्रकल्पाला गती मिळणार ?

राज्यात सत्तासंघर्षानंतर नवं शिंदे सरकार विराजमना झालं आहे. राज्यात शिंदे सरकार सत्तारुढ झाल्यावर बुलेट ट्रेनचा मार्ग मोकळा होणार आहे.
bullet train news and eknath shinde
bullet train news and eknath shinde saam tv
Published On

सुशांत सावंत

मुंबई : राज्यात सत्तासंघर्षानंतर नवं शिंदे सरकार विराजमान झालं आहे. राज्यात शिंदे सरकार सत्तारुढ झाल्यामुळे बुलेट ट्रेनचा मार्ग मोकळा होणार आहे. नव्या सरकारमुळे मोदींच्या महत्वाकांक्षी प्रकल्पाला गती मिळणार आहे. मुंबई मेट्रो पाठोपाठ आता मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या कामालाही गती मिळणार आहे. महाविकास आघाडी सरकारमुळे (MVA) रखडलेल्या बुलेट ट्रेनचा (Bullet Train) प्रकल्पाला गती मिळणार, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. ( bullet train news In Marathi )

bullet train news and eknath shinde
विरोधी पक्षनेतेपदासाठी अजित पवार, जयंत पाटील यांच्या नावाची चर्चा; कोणाची लागणार वर्णी?

बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी महाराष्ट्रात सुमारे १५० हेक्टर क्षेत्राचं अधिग्रहण करणं गरजेचं आहे. अद्याप या कामाने वेग घेतलेला नाही. काही दिवसांपूर्वी बुलेट ट्रेन प्रकल्पाची पाहणी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी केली होती. त्यावेळी बुलेट ट्रेन प्रकल्प रखडल्याने महाविकास आघाडी सरकारवर टीका केली होती. मात्र, राज्यात आता भाजपप्रणित शिंदे सरकार आल्याने बुलेट ट्रेन प्रकल्पाला वेग मिळण्याची शक्यता आहे. बुलेट ट्रेनमधील खर्चाचा राज्याच्या वाट्याला येणारा खर्चही शिंदे सरकार करणार आहे. ठाकरे सरकारच्या काळात बुलेट ट्रेनला मोठ्या प्रमाणात विरोध झाल्याने बुलेट ट्रेनचे काम मंदावले होते. मात्र, आता मेट्रो पाठोपाठ बुलेट ट्रेनच्याही कामाला गती येणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदींचा महत्वाकांक्षी प्रकल्प मार्गी लागणार आहे.

bullet train news and eknath shinde
Jalna | 'बाप्पा लग्न सुरू करा' म्हणत केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंनी विवाह सोहळ्यात धरला अंतरपाट

दरम्यान, मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पातील दादरा-नगर हवेलीतील १०० टक्के, गुजरातमधील ९८.७९ टक्के आणि महाराष्ट्रातील ७१ टक्के जागेचे संपादन पूर्ण झाले आहे. प्रकल्प खर्चवाढ टाळण्यासाठी प्रकल्पासाठी ८५ टक्के जमीन अधिग्रहित केल्याशिवाय प्रत्यक्ष काम न करण्याचा रेल्वे मंडळाकडून सूचना देण्यात आल्या होत्या. यामुळे राज्यात बुलेट ट्रेनच्या कामाला अडथळा निर्माण झाला होता. मात्र,आता राज्यात भाजपप्रणित शिंदे सरकार आल्याने बुलेट ट्रेन प्रकल्पाचा मार्ग मोकळा होणार आहे. मात्र, या प्रकल्पावर शिवसेनेची काय भूमिका असणार आहे याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com