अश्विनी जाधव केदारी
पुणे: शहरातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाकडे (Builder in Pune) उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या नावाने तब्बल वीस लाख रुपयांची खंडणी (Ransom of twenty lakh rupees) मागण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी गुन्हे शाखेच्या युनिट 1 च्या (Pune Crime Branch Police) पथकाने सहा जणांना अटक केली आहे. (Pune Crime News In Marathi)
नवनाथ भाऊसाहेब चोरामले (वय 28, रा हवेली), सौरभ नारायण काकडे (वय 20 रा हडपसर), सुनील उर्फ बाळा गौतम वाघमारे (वय 28), किरण रामभाऊ काकडे (वय 25), चैतन्य राजेंद्र वाघमारे (वय 19 रा भेकराई नगर, फुरसुंगी), आकाश शरद निकाळजे (वय 24) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
याप्रकरणी बड्या बांधकाम व्यावसायिकाने फिर्याद दिली होती. या प्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात (Bundgarden Police Station, Pune) गुन्हा नोंद करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार हा प्रकार मागील दहा दिवसांपासून 13 जानेवारीपर्यंत सुरू होता. (Pune)
बिल्डरने दाखल केलेल्या फिर्यादीनुसार, अटक करण्यात आलेल्या आरोपींनी आपसात संगणमत करून गूगल प्ले स्टोअर (Google Play Store) वरून फेक कॉल ॲप (Fake Call App) नावाचे ॲप डाऊनलोड केले होते. या ॲपद्वारे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री यांच्या मोबाईल क्रमांकाचा वापर करण्यात येत होता. त्या क्रमांकावरून बिल्डर यांना फोन केला. त्यांना फोनवरून उपमुख्यमंत्री यांचा पी.ए. बोलतोय असे सांगण्यात आले होते. बिल्डर यांना हवेली तालुक्यातील वाडेबोल्हाई येथील शिरसाटवाडी येथील बाबा भाऊ चोरामले व इतर नऊ जणांच्या मालकीची गट क्रमांक 85/1, 85/3 व 87 मधील एकूण सहा हेक्टर जमिनी संदर्भातील वाद मिटवून टाका असे सांगण्यात आले, तसेच त्यांना गावात पाऊल ठेवू देणार नाही, तुमचा कोणताही प्रकल्प (Project) होऊ देणार नाही अशी धमकी देण्यात आली. तसेच बिल्डर यांच्याकडे 20 लाख रुपयांची खंडणी (Ransom) मागून यातील दोन लाख रुपये आरोपींनी घेतले.
हे देखील पहा-
ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (Amitabh Gupta), सह पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे, सहायक पोलीस आयुक्त गुन्हे 1 गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शैलेश संखे, पोलीस उपनिरीक्षक संजय गायकवाड, सुनिल कुलकर्णी, पोलीस अंमलदार अजय जाधव, अजय थोरात, अमोल पवार, इम्रान शेख, तुषार माळवदकर, महेश बामगुडे महिला पोलीस अंमलदार मिना पिंजण, रुखसाना नदाफ यांनी केली. पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक शैलेश संखे करीत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.