अजित पवार
अजित पवार Saam Tv

Breaking: पुण्यातील शाळा सुरु होणार, अजित पवारांनी सांगितली नियमावली...

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात बंद असलेल्या शाळा येत्या १ तारखेपासून सुरु होत आहेत. अशी घोषणा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केली आहे.
Published on

प्राची कुलकर्णी

पुणे: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात बंद असलेल्या शाळा येत्या १ तारखेपासून सुरु होत आहेत. अशी घोषणा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केली आहे. त्यांनी आज माहिती दिली की, "1 तारखेपासून पुण्यातील शाळा आणि महाविद्यालये सुरु करण्यात येत आहेत. तर इयत्ता 9 वी आणि 10 वी मधल्या मुलांचे लसीकरण शाळेतच करण्यात येईल."

त्यांनी स्पष्टपणे सांगितलं, "मुलांना शाळेत पाठवायचं का याचा अंतीम निर्णय पालकांचा असेल. तसेच पहिली ते आठवी साठी पुढील आठवड्यात ४ तासच शाळा सुरु होतील. पहिली ते आठवी -हाफ डे शाळा असेल तर ९-१० वी पुर्णवेळ शाळा असेल अशी माहिती दिली आहे. तसेच जर रुग्णसंख्या वाढली नाही तर शाळा पूर्णवेळ सुरु करण्यासंदर्भात चर्चा करून निर्णय घेण्यात येईल अशीही त्यांनी यावेळी माहिती दिली.

अजित पवार
Nandurbar Crime: विनापरवाना गावठी पिस्तुल बाळगल्याप्रकरणी 26 वर्षीय युवकाला बेड्या

मास्क न लावण्याचा चर्चेबद्दल पवारांनी सांगितलं की, "मंत्रीमंडळ बैठकीत मास्क बाबत काहीही चर्चा नाही. मास्क घाला हे सांगितलं आहे. आमचं मत आहे. माहिती घेऊन बातम्या द्या. गेल्या दोन दिवसांत रुग्णसंख्या कमी झाली आहे."

पुढे त्यांनी सांगितलं की, तसेच या लाटेत १ कोटी ६१, ६०१ नागरिकांना लसीकरण झालेले आहे. सध्या ॲाक्सिजनची मागणी ९० मेट्रीक टन आहे. देशांत रुग्ण संख्या वाढत असली तरी महाराष्ट्रात कमी होते आहे अशी माहिती कोरोना आकडेवारीबद्दल अजित पवार यांनी दिली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com