Mumbai Police: मोठी बातमी! मुंबईतील सर्व पोलिसांच्या सुट्ट्या रद्द, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गृह खात्याचा निर्णय

Mumbai Police News: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील सर्व पोलिसांच्या सुट्ट्यात रद्द करण्यात आल्यात आहेत. साम टीव्हीला खात्रीलायक सूत्रांनी ही माहिती दिली आहे.
Mumbai Police Latest News
Mumbai Police Latest News Saam TV

Sachin Gaad, Saam TV

राज्यात सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. राजकीय नेते ठिकठिकाणी प्रचारसभा घेत आहेत. याच पार्श्वभूमीवर गृह खात्याने एक मोठा निर्णय घेतला आहे. मुंबईतील सर्व पोलिसांच्या सुट्ट्यात रद्द करण्यात आल्यात आहेत. साम टीव्हीला खात्रीलायक सूत्रांनी ही माहिती दिली आहे.

Mumbai Police Latest News
Mumbai Local Train: धावत्या लोकल ट्रेनमधून पडून आणखी एका तरुणाचा मृत्यू; मुंब्रा ते कळवा स्थानकादरम्यानची घटना

महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडलंय. चौथ्या टप्प्यासाठी सोमवारी १३ मे रोजी मतदान होणार आहे. यानंतर पाचव्या टप्प्यातील मतदान प्रक्रियेला सुरुवात होईल. मुंबईतील ६ लोकसभा मतदारसंघात २० मे रोजी मतदान होईल.

यामध्ये मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई उत्तर पूर्व, मुंबई उत्तर मध्य, मुंबई दक्षिण मध्य आणि मुंबई दक्षिण मतदारसंघाचा समावेश आहे. यापार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये तसेच पोलिसांची कमतरता पडू नये, यासाठी गृह खात्याने सर्व पोलिसांच्या सुट्ट्या रद्द केल्याची माहिती आहे.

यामध्ये साप्ताहिक सुट्ट्या आणि अन्य रजेचा देखील समावेश आहे. फक्त वैद्यकीय रजेला यामधून वगळण्यात आलं आहे. १८ मे ते २० मे दरम्यान मुंबईतील सर्व पोलिसांच्या साप्ताहिक व इतर रजा रद्द राहतील, असे आदेश वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिल्याची माहिती आहे.

Mumbai Police Latest News
Mumbai Local Train: तळपत्या उन्हात मुंबईकरांचा होणार खोळंबा, उद्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कोणत्या लोकल रद्द?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com