IIT Bombay : दर्शन सोळंकी आत्महत्या प्रकरणात मोठी अपडेट; जातीभेदावर समितीचा अहवाल

मुंबई आयआयटीने दिलेल्या अहवालात दर्शन सोळंकी आत्महत्येला खराब अॅकडमिक परफॉर्मन्स हे कारण असल्याची शक्यता वर्तवली आहे.
IIT Bombay
IIT Bombayजयश्री मोरे

Darshan Solanki : दर्शन सोळंकी आत्महत्या प्रकरणात मुंबई आयआयटीने एका समितीची स्थापन केली होती. या समितीचा अहवाल समोर आला आहे. दर्शन सोळंकी प्रकरणात जातीभेद होत असल्याचं म्हटलं जात आहे. दर्शन सोळंकी आत्महत्या प्रकरणात जातीभेद असल्याचा आरोप करण्यात आला होता. मात्र समितीने जातीभेदाच्या आरोपाला पूर्ण नाकारले आहे. मुंबई आयआयटीने दिलेल्या अहवालात दर्शन सोळंकी आत्महत्येला खराब अॅकडमिक परफॉर्मन्स हे कारण असल्याची शक्यता वर्तवली आहे. (Latest IIT Bombay Student News)

नेमकं काय आहे प्रकरण?

दर्शन सोळंकी हा मुंबईतील पवई आयआयटीचा विद्यार्थी होता. तो केमिकल इंजिनियरिंगच्या प्रथम वर्षात शिकत होता. 12 फेब्रुवारी रोजी त्याने हॉस्टेलच्या इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली होती. जातीभेद होत असल्याने त्याने आत्महत्या केली असा आरोप करण्यात आला होता. त्यामुळे यातील सत्यता पडताळण्यासाठी आयआयटी मुंबईने १२ सदस्यांची समिती नेमली.

IIT Bombay
Mumbai Crime : मुंबईत ५२ लाखांचे अंमली पदार्थ बाळगणाऱ्या आरोपीला अटक; मालवणी पोलिसांनची कारवाई

१२ सदस्यीय समितीने यावर आपला अहवाल दिला आहे. दर्शन सोळंकीने जातीभेद असल्याने आत्महत्या केल्याचा आरोप या समितीने फेटाळला आहे. यात त्यांनी म्हटलं आहे की, दर्शनने शैक्षणीक कारणास्तव आत्महत्या केली आहे.

IIT Bombay
ATM Crime: एटीएममधून पैसे काढताना वापरायचा नामी शक्‍कल; खात्यातून डेबिट न होता निघायची रक्‍कम

दर्शन सोळंकी हा फक्त १८ वर्षांचा होता. तो मुळचा अहमदाबाद येथील होता. तीन महिन्यांपूर्वीच शिक्षणासाठी तो मुंबईत आला. ११ फेब्रुवारी रोजी त्याची परीक्षा होती. त्याने १२ फेब्रुवारीरोजी कॅम्पसच्या सातव्या मजल्यावरून खाली उडी घेतली होती.

पवई पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. तसचे पुढील तपास सुरू केला होता. त्यावेळी 'आंबेडकर पेरियार फुले स्टुडंट सर्कल' या संस्थेने दर्शनने जातीभेदामुळे आत्महत्या केल्याचा आरोप केला. मुंबई आयाआयटीमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून जातीभेद सुरू आहे. येथील विद्यार्थ्यांना त्यांच्या जातीवरून अपशब्द वापरत हिनवले जाते असा आरोप करण्यात आला होता. त्यामुळेच स्थापन करण्यात आलेल्या समितीने आपल्या अहवालात जातीभेदाचा आरोप फेटाळला आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com