Andheri By-Election : लटकेंचा राजीनामा स्वीकारण्यात अडचण काय?; हायकोर्टाने BMCला फटकारलं

'नियमांत बसतंय मग राजीनामा का स्वीकारत नाही, अशी विचारणा मुंबई हायकोर्टाने मुंबई महापालिकेला केली.
Andheri By-Election, Mumbai BMC, Rutuja Latke
Andheri By-Election, Mumbai BMC, Rutuja LatkeSaam TV

Andheri By-Election : अंधेरी पोटनिवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांचा राजीनामा मुंबई महापालिकेने (BMC) अद्यापही स्वीकारलेला नाहीये. याप्रकरणी मुंबई हायकोर्टाने (Mumbai High Court) मुंबई महापालिकेला कडक प्रश्न विचारत चांगलंच खडसावलं आहे. 'नियमांत बसतंय मग राजीनामा का स्वीकारत नाही आहात?. राजीनामा स्वीकारणार आहात की नाही?', अशा शब्दात हायकोर्टाने महापालिकेला फटकारलं आहे. (Shivsena News Today)

Andheri By-Election, Mumbai BMC, Rutuja Latke
Bacchu Kadu : मी आता मंत्री होईल नाही तर..., आमदार बच्चू कडूंचं मोठं विधान

अंधेरी पोटनिवडणुकीत अर्ज भरण्याची उद्या (14 ऑक्टोबर) शेवटची तारीख आहे. मात्र, असं असून सुद्धा मुंबई महापालिकेने ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांचा राजीनामा स्वीकारलेला नाही. त्यामुळे लटके यांनी मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे. आज हायकोर्टात लटके यांच्या याचिकेवर सुनावणी झाली.

यावेळी हायकोर्टाने महापालिकेला चांगलंच खडसावलं आहे. 'नियमांत बसतंय मग राजीनामा का स्वीकारत नाही आहात. राजीनामा स्वीकारणात आहात की नाही?', असे तिखट प्रश्न विचारले आहेत. सध्या सुनावणी स्थगित करण्यात आली असून दुपारी अडीज वाजता पुन्हा सुनावणीला सुरूवात होणार आहे. त्यामुळे न्यायालय याबाबत काय निर्णय देणार? याकडेच सर्वांचंच लक्ष लागून आहे. (Latest Marathi News)

Andheri By-Election, Mumbai BMC, Rutuja Latke
Hingoli : युट्युबवर पाहिले अनेकवेळा व्हिडीओ; नंतर उचललं टोकाचं पाऊल; हिंगोलीतील धक्कादायक घटना

अंधेरीपोटनिवडणुकीत ठाकरेंचा प्लॅन बी तयार

लटके यांची उमेदवारी अडचणीत आल्यास ठाकरे गटाकडून प्लॅन बी तयार असल्याचं बोललं जातंय. त्यासाठी या नावांमध्ये माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर, प्रमोद सावंत आणि कमलेश राय ही तीन नावं निश्चित करण्यात आली आहे. आता या नावांमध्ये आणखी एका नावाची भर पडलीय. (Latest Marathi News)

लटके यांचे निकटवर्तीय उपविभाग प्रमुख अनिल खांडेकर यांनाही पक्षाकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नुकतीच ठाकरे गटाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्याची बैठक झाली या बैठकीत हा निर्णय घेतला असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com