Raj Thackeray : राज ठाकरे यांना मुंबई हायकोर्टाचा मोठा दिलासा; काय आहे नेमकं १५ वर्षांपूर्वीचं प्रकरण?

Raj Thackeray Breaking News : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना मुंबई उच्च न्यायालयानं दिलासा दिला आहे.
Raj Thackeray
Raj ThackeraySAAM TV

सचिन गाड, मुंबई

Raj Thackeray Breaking News : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना मुंबई उच्च न्यायालयानं दिलासा दिला आहे. सन २००८ साली परप्रांतीयांविरोधात केलेल्या आंदोलन प्रकरणात दोषमुक्त करण्यास नकार देणारा सांगलीतील इस्लामपूर सत्र न्यायालयाचा आदेश मुंबई उच्च न्यायालयानं रद्द केला आहे. तसेच राज ठाकरेंनी दोषमुक्तीसाठी केलेल्या अर्जावर पुन्हा नव्याने सुनावणी घेण्याचे आदेशही यावेळी देण्यात आले.

मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांना २००८ साली परप्रांतीयांविरोधात केलेल्या आंदोलन प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court) दिलासा दिला आहे. या प्रकरणात राज ठाकरेंनी दोषमुक्तीसाठी अर्जाद्वारे केलेली विनंती इस्लामपूर सत्र न्यायालयाने अमान्य केली होती. तो आदेश उच्च न्यायालयाने रद्द केला आहे. तसेच दोषमुक्तीसाठी केलेल्या अर्जावर पुन्हा नव्याने सुनावणी घेण्याचे आदेशही दिले आहेत. (Maharashtra Breaking News)

Raj Thackeray
Rahul Gandhi Convicted: मोठी बातमी! राहुल गांधी यांना दोन वर्षांची शिक्षा; मोदी आडनावाबद्दल 'ते' वक्तव्य भोवलं

२००८ मध्ये मनसेने आंदोलन केले होते. रेल्वे भरतीत मराठी तरुणांना नोकरी मिळावी, यासाठी राज्यभरात हे आंदोलन करण्यात आले होते. या प्रकरणात राज ठाकरेंविरोधात गुन्हा दाखल होऊन त्यांना अटकही करण्यात आली होती. सांगली जिल्ह्यातील शेडगेवाडीतही मनसेने आंदोलन केले होते. या प्रकरणी राज यांच्यासह इतर नेते आणि पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल झाले होते.

Raj Thackeray
Raj Thackeray News : राज ठाकरे यांच्याविरोधात पिंपरी-चिंचवड पोलिसांत तक्रार; प्रक्षोभक भाषण केल्याचा आरोप

महत्वाचे मुद्दे:

राज ठाकरे यांनी दोषमुक्तीसाठी वकिलांमार्फत केलेल्या अर्जावर पुन्हा नव्याने सुनावणी घेण्याचे आदेश उच्च न्यायालयाने जिल्हा सत्र न्यायालयाला दिले आहेत.

२००८ साली मनसेने केलेल्या आंदोलन प्रकरणात राज ठाकरेंना झाली होती अटक

या प्रकरणातून दोषमुक्त करण्यासाठी राज ठाकरेंनी वकिलांमार्फत २०१३ मध्ये न्यायालयात अर्ज केला होता.

न्यायदंडाधिकारी न्यायालयानं हा अर्ज फेटाळला होता.

त्यानंतर राज यांनी पुन्हा अर्ज केला होता, पण तोही फेटाळण्यात आला होता.

त्याविरोधात राज यांनी इस्लामपूर सत्र न्यायालयात केलेली याचिकाही ३ फेब्रुवारी २०२३ रोजी फेटाळत अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केला होता.

सांगलीमधील आंदोलनाला आपण चिथावणी दिली, यात तथ्य नाही. घटनेच्या वेळी आपण अटकेत होतो. त्यामुळे चिथावणी देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असा दावा राज यांनी याचिकेतून केला होता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com