Herbal Hookah Bar : हर्बल अथवा तंबाखू मुक्त हुक्का बार चालवण्यास बॉम्बे हायकोर्टाकडून परवानगी देण्यात आली आहे. सिगारेट आणि इतर तंबाखू उत्पादने कायदा, २००३ (COTPA) चे उल्लंघन होत नसेल. तर हर्बल किंवा तंबाखूमुक्त हुक्का देण्यास परवानगी असल्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने पुन्हा एकदा स्पष्ट केले. बॉम्बे हायकोर्टाने २०१९ च्या आपल्याच आदेशाचा पुनरुच्चार केला अन् कायद्यानुसारच कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले. (Is herbal hookah legal in Maharashtra)
१४ ऑक्टोबर रोजी मुंबई उच्च न्यायालयाने रेस्टोरेंटमध्ये हर्बल हुक्काच्या विक्रीला मंजूरी दिली. १२ हुक्का बार मालकांच्या याचिकेवर सुनावणी झाली. त्यावेळी कोर्टाने तंबाखूमुक्त हुक्का बार चालवण्यास परवानगी दिली. हर्बल हुक्कामुळे कोणत्याही कायद्याचे उल्लंघन होत नसल्याचं यावेळी सांगण्यात आले. पोलिसांच्या वारंवार करण्यात येणाऱ्या कारवाईविरोधात हुक्का बार मालकांनी कोर्टात धाव घेतली होती. पोलिसांची छापेमारी अथवा धमकीशिवाय व्यावसाय सुरू करण्याची परवानगी कोर्टात करण्यात आली. न्यायाधीश रियाज छागला आणि फरहान दुबाश यांच्या खंडपीठाने म्हटले की, रेस्टॉरंट्स चालवण्यास किंवा तंबाखू किंवा निकोटीन-मुक्त हुक्का देण्यास मनाई नाही.
याचिका करणारे COTPA चे पालन करत आहेत. हुक्का पार्लरमध्ये बंदी घातलेले कोणतेही पदार्थ देत नाहीत, तोपर्यंत त्यांच्यावर कोणतीही कारवाई करता येणार नाही. पण हुक्का बारमध्ये जर निकोटीन असलेल्या वस्तू दिल्याचे निदर्शनास आल्यास पोलिसांनी COTPA अंतर्गत कठोर कारवाई करावी, असे हाय कोर्टाने आपल्या आदेशात म्हटले.
हर्बल हुक्का हा निकोटीन मुक्त आणि तंबाखू मुक्त हुक्का आहे. निकोटीन मुक्त हुक्काला हर्बल हुक्का म्हणतात, कारण त्यात पारंपारिक हुक्कामध्ये आढळणाऱ्या तंबाखूच्या पानांऐवजी विविध नैसर्गिक घटक असतात. हर्बल हुक्कामधील नैसर्गिक घटकांमध्ये उसाचा लगदा, चहाची पाने किंवा सुकामेवा यांचा समावेश असतो. तो गूळ, ग्लिसरीन आणि फ्लेवरिंगच्या मिश्रणात मिसळला जातो.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.