Mumbai News: पावसाळ्यात मुंबईची तुंबई होणार नाही? मुंबईतील नाल्यातून आतापर्यंत इतका टन गाळ काढला

मुंबई महापालिकेने पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून मुंबई महानगरातील नाल्यांमधून गाळ काढण्याचे निश्चित उद्दिष्ट मुदतीपूर्वीच गाठले गेले आहे.
Mumbai News
Mumbai NewsSaam tv

Mumbai News: मुंबई महापालिकेने पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून मुंबई महानगरातील नाल्यांमधून गाळ काढण्याचे निश्चित उद्दिष्ट मुदतीपूर्वीच गाठले गेले आहे. यंदा पावसाळ्यापूर्वी एकूण ९ लाख ७९ हजार ८८२ मेट्रिक टन गाळ काढण्याचे उद्दिष्ट निश्चित केले होते. पैकी, आज दुपारी १२ वाजेपर्यंत झालेल्या नोंदीनुसार आतापर्यंत ९ लाख ८४ हजार ९२७ मेट्रिक टन म्हणजे निर्धारित उद्दिष्टाच्या १००.५१ टक्के गाळ काढण्‍यात आला आहे.

पावसाळ्यापूर्वी म्हणजे दिनांक ३१ मे २०२३ रोजीच्या ठरवलेल्या मुदतीच्या एक आठवड्यापूर्वीच गाळ काढण्‍याचे उद्दिष्ट गाठण्यात आले आहे, अशी माहिती अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांनी दिली आहे. (Latest Marathi News)

मुंबईत दरवर्षी पावसाळ्यापूर्वी महानगरपालिकेच्या पर्जन्य जलवाहिन्या विभागाच्या माध्यमातून मुंबई महानगरातील मोठ्या नाल्यांमधून गाळ काढला जातो. तर विभाग कार्यालयांच्या स्तरावर लहान नाल्यांमधून गाळ काढण्याची कामे केली जातात.

नाल्यांमधून गाळ काढल्याने पावसाळी पाण्याचा जलद गतीने निचरा होण्यासाठी मदत होते. पावसाळ्यापूर्वी नाल्यांमधून किती गाळ उपसणे आवश्यक आहे, याचा अभ्यास करुन दरवर्षी गाळ काढण्याचे उद्दिष्ट निश्चित केले जाते

Mumbai News
Sanjay Raut Criticism: 'देवेंद्र फडणवीसांवर ही काय वेळ आलीय...', CM शिंदेंच्या वाहनाच्या सारथ्यावर संजय राऊतांचा खोचक टोला

मुंबई महानगरातील पर्जन्यमान आणि पावसाची तीव्रता याबाबतचा अनुभव लक्षात घेऊन, हे उद्दिष्ट दरवर्षी ठरविले जाते. यंदा ९ लाख ७९ हजार ८८२ मेट्रिक टन गाळ काढण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले होते. तसेच, गाळ काढण्याच्या कामांना दिनांक ६ मार्च २०२३ रोजी प्रारंभ करण्यात आला होता. तर, काम पूर्ण करण्याची मुदत दिनांक ३१ मे २०२३ ठरवली होती. या विहित मुदतीपूर्वीच नाल्‍यातून गाळ काढण्‍याचे १०० टक्के उद्दिष्ट गाठण्यात आले आहे.

गाळ काढण्याची सर्व कामे नियोजित वेळापत्रकाप्रमाणे पूर्ण करावीत, आवश्यक तेथे अतिरिक्त यंत्रणा, मनुष्यबळ नेमून कामांना वेग द्यावा, असे निर्देश महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांनी यंत्रणेला दिले होते.

त्यानुसार, शहर, पूर्व उपनगरे आणि पश्चिम उपनगरे या तीनही विभागांमध्ये कामे जलदगतीने करण्यात येत आहेत. उद्दिष्ट गाठले गेले असले तरी त्याहूनही अधिक गाळ काढण्याचे काम यापुढेही सुरु राहणार आहे, अशी माहिती उपआयुक्त (पायाभूत सुविधा) उल्हास महाले यांनी दिली आहे.

Mumbai News
BJP News : कर्नाटक निवडणुकीच्या निकालाचा धसका? महाराष्ट्र भाजपमध्ये मोठ्या फेरबदलाचे वारे

गाळ काढण्याची कामे योग्यरित्या होण्यासह त्यावर देखरेख करण्याच्या दृष्टीने महानगरपालिकेने कंत्राटांमध्ये यंदा अधिक सक्त अटी व शर्तींचा समावेश केला आहे. प्रत्येक कामासाठी दृकश्राव्य चित्रफित (व्हिडिओ क्लीप) आणि छायाचित्रे सादर करणे बंधनकारक केले आहे.

काम सुरु होण्यापूर्वी, प्रत्यक्ष काम सुरु असताना आणि काम संपल्यानंतर अशा तिनही टप्प्यांमध्ये प्रत्यक्ष दिनांक, वेळ, अक्षांश, रेखांश (रिअलटाइम जिओ टॅग) यासह चित्रफित व छायाचित्रे तयार करुन ती सॉफ्टवेअरवर अपलोड करणे कंत्राटदारांना बंधनकारक केले आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com