शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर; रक्तदात्यांना चिकन आणि पनीर!

मांसाहारी रक्तदात्याला २ किलो चिकन तर शाकाहारी रक्तदात्यास अर्धा किलो पनीर! रक्तदान शिबिरात आतापर्यंत 500 किलो चिकन आणि 50 किलो पनीरचे वाटप रक्तदात्यांना करण्यात आले आहे.
शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर; रक्तदात्यांना चिकन आणि पनीरचे वाटप!
शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर; रक्तदात्यांना चिकन आणि पनीरचे वाटप! अश्विनी जाधव
Published On

पुणे : 'पुणे तिथं काय उणे' असं म्हटलं जातं. पुणेकर देखील या म्हणीचा प्रत्यय विविध कृतीद्वारे दाखवून देत असतात. आजही राष्ट्रवादीचे (NCP) सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्या 81 व्या वाढदिवसानिमित्त पुणे (Pune) शहरात एका अनोख्या रक्तदान शिबिराची चर्चा सुरू आहे. याचं कारण म्हणजे या रक्तदान शिबिरात चक्क मांसाहारी रक्तदात्याला 2 किलो चिकन तर शाकाहारी रक्तदात्याला आर्धा किलो पनीर देण्यात येत आहे.

हे देखील पहा :

राज्यात कोरोनाच्या (Corona) पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या वतीने राज्यात विविध ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात यावे, असे आवाहन करण्यात आले आहे. पुण्यातील कोथरूड (kothrud) परीसरात माजी नगरसेवक शंकर केमसे यांच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले आहे.

शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर; रक्तदात्यांना चिकन आणि पनीरचे वाटप!
बाब्बो! पाकिस्तानी ट्रेन ड्रायव्हरने दही घेण्यासाठी चक्क ट्रेनच थांबवली; झाला निलंबित (VIDEO)
शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर; रक्तदात्यांना चिकन आणि पनीरचे वाटप!
२८ वर्षीय महिला पोलीस कर्मचार्‍याची गळफास घेऊन आत्महत्या! संशयास्पद प्रकरण?

या रक्तदान शिबिरात (Blood Donation Camp) रक्तदात्यांकडूनही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. दुपारपर्यंत रक्तदान शिबिरात 500 किलो चिकन (Chicken) आणि 50 किलो पनीरचे (Paneer) वाटप रक्तदात्यांना करण्यात आले आहे. अशी माहिती आयोजक शंकर केमसे यांनी दिली आहे.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com