Goa Politics: गोव्याच्या मुख्यमंत्री पदासाठी भाजपची महत्वाची बैठक; फडणवीस दिल्लीला रवाना...

Devendra Fadnavis Delhi Tour: गोव्यात विधानसभेच्या ४० जागा आहेत. सत्ता स्थापनेसाठी २१ आमदारांची गरज असते. भाजपचे २० आमदार निवडून आले असून सरकार स्थापनेसाठी भाजपला केवळ एकाच आमदाराची गरज आहे.
BJP's important meeting for the post of Chief Minister of Goa; Fadnavis leaves for Delhi ...
BJP's important meeting for the post of Chief Minister of Goa; Fadnavis leaves for Delhi ...Saam TV
Published On

सुशांत सावंत, मुंबई

मुंबई: देशातील पाच राज्यांत विधानसभा निवडणुका संपन्न झाल्या. यात पाच पैकी चार राज्यांत भाजपला घवघवीत यश मिळालं. गोव्यातही भाजपला मोठं यश मिळालं. गोव्याच्या विधानसभा निवडणुकीची (Goa Assembly Election 2022) जबाबदारी भाजपने महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते तथा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर दिली होती. आता गोव्याचा मुख्यमंत्री ठरवण्यासाठी हालचाली सुरु झाल्या आहे. देवेंद्र फडणवीस हे दिल्लीला रवाना झाले आहेत. (BJP's important meeting for the post of Chief Minister of Goa; Fadnavis leaves for Delhi ...)

हे देखील पहा -

गोवा विधानसभा निवडणुकीत फडणवीस हे भाजपकडून (BJP) गोव्याचे निवडणूक प्रभारी होते. फडणवीसांच्या मार्गदर्शनाखाली गोव्यात भाजपनं घवघवीत यश मिळवलं. त्यामुळे आता सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी भाजप तयार आहे. याबाबत आता रणनीती आखली जात आहे. यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस दिल्लीसाठी (Delhi) रवाना झाले आहेत. आज संध्याकाळी केंद्रीय समितीची बैठक आहे. गोव्याचे प्रभारी म्हणून देवेंद्र फडणवीस या बैठकीला उपस्थित असतील.

गोव्यात विधानसभेच्या ४० जागा आहेत. सत्ता स्थापनेसाठी २१ आमदारांची गरज असते. भाजपचे २० आमदार निवडून आले असून सरकार स्थापनेसाठी भाजपला केवळ एकाच आमदाराची गरज आहे. मात्र सरकार आणखीन मजबूत करण्यासाठी भाजप आणखी आमदारांना पक्षात घेण्याचा प्रयत्न करेल. ४० पैकी भाजप २०, कॉंग्रेस ११, आम आदमी पक्ष २, महाराष्ट्रवादी गोमन्तक पक्ष २, गोवा फॉरवर्ड पार्टी १ आणि इतर ४ असा गोवा विधानसभा निवडणुक २०२२ चा निकाल आहे.

BJP's important meeting for the post of Chief Minister of Goa; Fadnavis leaves for Delhi ...
Devendra Fadnavis: भाजप दरेकरांच्या पाठीशी, फडणवीसांची घरी जाऊन भेट

भाजप गोव्यातला सर्वात मोठा पक्ष ठरला असला तरी सत्ता स्थापनेत वाटाघाटी आणि मंत्रिमंडळाच्या निवडीसाठी भाजपच्या केंद्रीय समितीची दिल्लीत होणारी ही बैठक महत्वाची असणार आहे, त्यामुळे फडणवीस हे यात महत्वाची भूमिका बजावणार आहेत. गोव्यात घवघवीत यश मिळवल्यानंतर फडणवीसांचं मुंबईत जंगी स्वागत करण्यात आलं होतं. मुंबई विमानतळ ते भाजप कार्यालयापर्यंत विजयीयात्रा काढण्यात आली होती. यात भाजपचे सर्वा आमदार उपस्थित होते. अनेकांनी गाण्यांवर ठेकाही घेतला होता.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com