Devendra Fadnavis: भाजप दरेकरांच्या पाठीशी, फडणवीसांची घरी जाऊन भेट

भाजपचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रविण दरेकर यांची भेट घेतली आहे
Devendra Fadnavis
Devendra FadnavisSaam Tv
Published On

सुशांत सावंत -

मुंबई: बोगस मजूर प्रकरणी राज्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकरांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचा भाजपकडून जोरदार विरोध होतो आहे. यातच भाजपचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रविण दरेकर यांची भेट घेतली आहे (Devendra Fadnavis And Other BJP MLAs Visited Pravin Darekar).

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दरेकर यांच्या अवंती निवास येथील घरी जाऊन भेट घेतली. दरेकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर फडणवीस यांनी दरेकर यांची भेट घेतली आहे.

Devendra Fadnavis
Budget Session: दरेकरांवरील गुन्हा हा रडीचा डाव, भाजप नेत्यांकडून प्रविण दरेकरांवरील कारवाईचा निषेध

भाजप नेते दरेकरांच्या पाठीशी

प्रवीण दरेकर यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर आता भाजप (BJP) नेते दरेकर यांच्या पाठीशी उभे राहिले आहेत. फडणवीसांशिवाय दरेकर यांच्या घरी भाजपचे विधान परिषदेचे आमदार आले आहेत. आज प्रसाद लाड, निरंजन डावखरे, भाई गिरकर, निलय नाईक, रमेश दादा दरेकर यांच्या भेटीला आले आहेत.

प्रविण दरेकरांवर गुन्हा दाखल

प्रविण दरेकर यांनी मुंबै बँक (Mumbai Bank) निवडणुकीकरिता मजूर संस्थेअंतर्गत अर्ज दाखल करण्यात केला. या अगोदर देखील दरेकर मजूर संस्थेचे प्रतिनिधी म्हणूनच मुंबै बँकेवर अध्यक्ष म्हणून निवडून आले होते. त्या प्रकरणी आम आदमी पक्षाने (AAP) आक्षेप घेत पोलिसामध्ये तक्रार केली होती. यानंतर आता प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांच्यावर मुंबईतील माता रमाबाई आंबेडकर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Edited By - Nupur Uppal

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com