Maharashtra Politics : २०२४ मध्ये बारामतीतच घड्याळ बंद पाडू; भाजप नेत्याचं थेट आव्हान

रोहित पवार यांच्या या दाव्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे यांनी घड्याळ बंद पाडण्याचं विधान केल्याने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे.
Sharad Pawar
Sharad Pawar Saam Tv
Published On

BJP Chandrashekhar Bawankule vs NCP : '२०२४ निवडणुकीत बारामतीतच राष्ट्रवादी कॉग्रेस (NCP) पक्षाचं घड्याळ बंद पाडू', असा इशारा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला आहे. ‘घड्याळ लवकरच बंद पाडणार. तेही बारामतीमधून.. त्यांना कळणारही नाही. अशा पद्धतीने आम्ही घड्याळ बंद पाडू,’ असं बावनकुळे यांनी म्हटलं आहे. (Maharashtra Politics Latest News)

Sharad Pawar
शिंदे-फडणवीस सरकारचा मोठा निर्णय! ६ लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट ५० हजार रुपये जमा

पुणे जिल्हा परिषदेच्या सत्तेनंतर भाजपाने राष्ट्रवादी कॉग्रेस समोर मोठं आव्हान उभं करण्याची घोषणा केली आहे. तसे संकेत सुद्धा भाजपकडून देण्यात आले आहे. विशेष बाब म्हणजे भाजपचा राष्ट्रवादी कॉंग्रेस फोडण्याचा डाव आहे, असा दावा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केला होता.

दरम्यान, रोहित पवार यांच्या या दाव्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी घड्याळ बंद पाडण्याचं आव्हान दिल्याने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे. चंद्रशेखर बावनकुळे हे सध्या पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. आगामी निवडणुकीपूर्वी ते पक्षामधील पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेत आहे.

Sharad Pawar
Cabinet Decision : शिंदे-फडणवीस सरकारचे मोठे निर्णय; दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट, तर राजकीय सामाजिक आंदोलनातील गुन्हे मागे घेणार

बावनकुळे हे प्रामुख्याने राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यामध्ये जाऊन भाजपला बळकटी देण्याचे प्रयत्न करत आहे. बारामती नंतर त्यांनी आता पुण्यातील खेड आणि आळंदीवरही लक्ष केंद्रीत केलं आहे. त्यामुळे बावनकुळे यांची आखलेली रणनिती खरंच राष्ट्रवादीला धक्का देणार का? हेच पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

रोहित पवार काय म्हणाले होते?

शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादीत फूट पाडण्याचा भाजपचा डाव आहे, असा खळबळजनक दावा राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केला होता. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हा दावा केला होता. शिवसेनेनंतर राष्ट्रवादीत फूट पाडण्याचा भाजपचा डाव आहे. राष्ट्रवादी फोडण्याचं भाजपचं टार्गेट आहे, असं रोहित पवार यांनी म्हटलं होतं.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com