शिंदे-फडणवीस सरकारचा मोठा निर्णय! ६ लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट ५० हजार रुपये जमा
मुंबई: राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी शिंदे-फडणवीस सरकारने (Shinde-Fadnavis government) महत्वाचा निर्णय घेतला आहे. नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या जवळपास ६ लाख ९० हजार शेतकऱ्यांच्या खात्यामंध्ये शासनाने ५० हजार रुपये पाठवले आहेत.
या मोठ्या निर्णयाबाबतची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज पत्रकारपरिषदेत दिली आहे. दिवाळीनिमित्त शासनाने शेतकऱ्यांना खास भेट दिली असल्याचंही फडणवीसांनी यावेळी सांगितलं .
पत्रकार परिषदेत बोलताना फडणवीस म्हणाले, आजचा दिवस खूप आनंदाचा आणि समाधानाचा दिवस आहे. अडीच वर्षापुर्वी झालेली घोषणा आज प्रत्येक्षात अमंलात येणार आहे. ज्यावेळी राज्यामध्ये आपण पहिल्यांदा कर्जमाफी केली त्यावेळी नियमित कर्ज भरणाऱ्याच्या खात्यात २५ हजार रुपये दिले होते.
दुसऱ्यांदा झाली त्यावेळी ५० हजार रुपये भरले जातील अशी घोषणा केली. मात्र, अडीच वर्ष ते पैसे भरणं जमलं नाही. मात्र, एकनाथ शिंदे साहेबांनी (Eknath Shinde) मुख्यमंत्रीपदाची सुत्र हातात घेतल्यावर पहिल्याचं बैठकीमध्ये त्यांनी सांगितलं की, आपणाला हा निर्णय घ्यायचा आहे.
शेतकऱ्याच्या खात्यामध्ये ५० हजार रुपये तात्काळ जायला हवेत असं ते म्हणाले होते. शिवाय अनेक वेळा शेतकऱ्यांपर्यंत पैसे लवकर पोहचत नाहीत म्हणून आम्ही ज्या खात्यांचे प्रमाणीकरण झालं आहे त्या सर्व ६ लाख ९० हजार शेतकऱ्यांच्या खात्यामंध्ये मुख्यमंत्र्याच्या एका क्लिकमध्ये सर्व पैसे पोहचवले असल्याची माहिती देखील फडणवीसांनी यावेळी दिली.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.