'ये तो एक झांकी है,...'; राज्यसभेच्या विजयानंतर चंद्रकांत पाटलांचे सूचक वक्तव्य

राज्यसभेच्या निवडणुकीत विजयानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी 'ये तो एक झांकी है, पुणे महानगरपालिका बाकी है' , असं सूचक वक्तव्य केलं आहे.
Chandrakant Patil
Chandrakant Patil Saam Tv

प्राची कुलकर्णी

पुणे : राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे ३ उमेदवार निवडून आले आहेत. तर भाजपचेही तीन उमेदवार निवडून आले आहेत. या निवडणुकीत भाजपचे धनंजय महाडिक आणि शिवसेनेचे संजय पवार यांच्यामध्ये थेट लढत होती. या लढतीत कोल्हापूरच्या धनंजय महाडिकांचा विजय झाला. राज्यसभेच्या निवडणुकीत विजयानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी 'ये तो एक झांकी है, पुणे महानगरपालिका बाकी है' , असं सूचक वक्तव्य केलं आहे. ( Maharashtra Political News In Marathi )

Chandrakant Patil
Rajya Sabha Election 2022: सुहास कांदे निवडणूक आयोगा विरोधात उच्च न्यायालयात जाणार

राज्यसभेच्या निवडणुकीत भाजपचे पियुष गोयल, अनिल बोंडे आणि धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांचा विजय झाला आहे. राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी भाजपचे धनंजय महाडिक आणि शिवसेनेचे संजय पवार यांच्यात थेट लढत होती. या लढतीत शिवसेनेच्या संजय पवारांचा पराभव झाला. राज्यसभेच्या निवडणुकीत भाजपने (BJP) यश प्राप्त केल्यानंतर त्यांचा आत्मविश्वास दुणावल्याचे दिसत आहे. आता आगामी पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सूचक ट्विट केलं आहे.

चंद्रकांत पाटील म्हणाले, 'कोल्हापूरच्या पहिलवानाने 'हाप की डाव' टाकला आणि राऊत सहाव्या क्रमांकावर फेकले गेले. आता असाच हाप की डाव पुणे महानगरपालिकेत टाकायचा आहे.'. या ट्विटला 'ये तो एक झांकी है, पुणे महानगरपालिका बाकी है, असं कॅप्शनही दिलं आहे. चंद्रकांत पाटलांच्या या ट्विटनंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

शरद पवारांनी केले देवेंद्र फडणवीसांचे कौतुक

राज्यसभेत भाजपने तीन जागा जिंकल्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांचे कौतुक केलं आहे. पवार म्हणाले, 'भाजपने आम्हाला पाठिंबा देऊ इच्छिणारे जे अपक्ष आमदार होते. त्या अपक्षांना आपल्या बाजूला घेण्यासाठी जी कारवाई केली त्यात त्यांना यश आलं. त्यामुळे हा फरक पडला आहे. बाकी महाविकास आघाडीच्या संख्येप्रमाणे मतदान झालं आहे त्यात वेगळं काही नाही. जो चमत्कार झालेला आहे, तो चमत्कार मान्य केला पाहिजे. देवेंद्र फडणवीस यांनी विविध मार्गांनी माणसांना आपलंसं करणं त्या मार्गात त्यांना यश आलं आहे. पण, यामुळे सरकारला काही धोका नाही'.

Edited By - Vishal Gangurde

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com