Maharashtra Politics: महाराष्ट्र राज्य सहकारी संघावर भाजपचं वर्चस्व, प्रवीण दरेकरांकडे एकहाती सत्ता

Maharashtra Cooperative Union Election: महाराष्ट्र राज्य सहकारी संघाच्या निवडणुकीमध्ये भाजपला मोठं यश आले आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी संघावर भाजपचं वर्चस्व आहे. प्रवीण दरेकरांकडे एकहाती सत्ता आली आहे.
Maharashtra Politics: महाराष्ट्र राज्य सहकारी संघावर भाजपचं वर्चस्व, प्रवीण दरेकरांच्या हाती एक हाती सत्ता
Pravin Darekar Saam Tv
Published On

Summary -

  • महाराष्ट्र राज्य सहकारी संघाच्या निवडणुकीत प्रवीण दरेकर पॅनलचा दणदणीत विजय

  • दरेकर पॅनलला १९ जागांवर विजयी

  • या निवडणुकीत ९ संचालक बिनविरोध निवडून आले

  • या निवडणुकीत दरेकर बंधूंच्या हाती एकहाती सत्ता

  • राज्य सहकारी संघावर भाजपचा झेंडा

महाराष्ट्र राज्य सहकारी संघाच्या निवडणुकीत भाजपला मोठं यश मिळाले आहे. या निवडणुकीत 'दरेकर पॅनल'ला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. २१ पैकी १९ जागांवर दरेकर पॅनल विजयी झाले आहे तर २ जागा विरोधी पक्षाला गेल्या. त्यामुळे महाराष्ट्र राज्य सहकारी संघावर भाजपने झेंडा फडकावला. प्रवीण दरेकरांकडे एकहाती सत्ता आली आहे. या निवडणुकीच्या निकालादरम्यान दरेकर पॅनल आघाडीवर होते आतापर्यंत १५ जागांचे निकाल आले आहेत आणि या सर्व जागांवर दरेकर पॅनलने बाजी मारली आहे.

ब्रेक

महाराष्ट्र राज्य सहकारी संघावर प्रवीण दरेकर यांची एक हाती सत्ता

21 जागांपैकी १९ जागांवर प्रवीण दरेकर यांचा पॅनल विजयी

दोन जागा विरोधी पक्षाला

राज्यामध्ये सहकार शिक्षण-प्रशिक्षणासाठी कार्यरत असलेल्या महाराष्ट्र राज्य सहकारी संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीचा निकाल आज लागला. महाराष्ट्र राज्य सहकारी संघाच्या निवडणुकीमध्ये आमदार प्रवीण दरेकर आणि प्रकाश दरेकर हे बंधू बिनविरोध निवडून आले आहेत. २१ पैकी १९ जागांवर दरेकर पॅनल विजयी झाला आहे. तर २ जागांवर विरोधी पक्ष विजयी झाला आहे.

२१ पैकी ९ संचालकांच्या जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत. तर १२ संचालकांच्या जागांसाठी ३० उमेदवार निवडणूक रिंगणात उभे आहेत. त्यासाठी २७ जुलैला मतदान झाले होते. या निवडणूक निकालामध्ये भाजपचे आमदार प्रवीण दरेकर आणि त्यांचे बंधू प्रकाश दरेकर हे दोघेही बिनविरोध निवडून आले आहेत.

Maharashtra Politics: महाराष्ट्र राज्य सहकारी संघावर भाजपचं वर्चस्व, प्रवीण दरेकरांच्या हाती एक हाती सत्ता
Pravin Darekar: महाराष्ट्राच्या जनतेची पुन्हा आम्हाला पसंती, प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया | Video

या निवडणुकीमध्ये ९ संचालक बिनविरोध निवडून आले आहेत. त्यामध्ये विभागीय सहनिबंधक सहकारी संस्थांच्या वैधानिक कार्यक्षेत्रातील मतदारसंघात जिल्हा सहकारी बोर्ड प्रतिनिधींचा समावेश आहे. त्यामध्ये जिल्हा सहकारी बोर्ड मतदारसंघातून विभागनिहाय स्थिती पुढीलप्रमाणे आहे. मुंबई विभागातून भाजपचे आमदार प्रवीण दरेकर, पुणे विभागातून हिरामण सातकर, कोकण विभागातून अरुण पानसरे, छत्रपती संभाजीनगर विभागातून गुलाबराव मगर या चार संचालकांचा समावेश आहे.

Maharashtra Politics: महाराष्ट्र राज्य सहकारी संघावर भाजपचं वर्चस्व, प्रवीण दरेकरांच्या हाती एक हाती सत्ता
MNS vs BJP: दिन तुम्हारा, मैदान तुम्हारा, वक्त तुम्हारा; मनसे नेत्याचं भाजप खासदाराला आव्हान, मनसे-भाजप वाद टोकाला

तर राज्यस्तरीय संघीय संस्था मतदार संघातून प्रकाश दरेकर, अनुसूचित जाती,जमाती मतदार संघातून विष्णू घुमरे, भटक्या विमुक्ती जाती, जमाती व विशेष मागास प्रवर्गातून अनिल गाजरे आणि महिला प्रतिनिधींमध्ये जयश्री पांचाळ, दीपश्री नलवडे या ५ संचालकांचा समावेश आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी संघावर भाजपचा झेंडा फडकल्यामुळे आणि प्रवीण दरेकरांच्या हाती एक हाती सत्ता आल्यामुळे जल्लोष केला जात आहे.

Maharashtra Politics: महाराष्ट्र राज्य सहकारी संघावर भाजपचं वर्चस्व, प्रवीण दरेकरांच्या हाती एक हाती सत्ता
BJP : भाजप नेत्याचा मुलाच्या कारमध्ये आढळले ड्रग्स, तरुणीसह पळून जाताना पोलिसाच्या अंगावर चढवली कार

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com