भाजपचा पदाधिकारीच निघाला आरोग्य भरतीच्या पेपरफुटी प्रकरणातील दलाल

आरोग्य भरतीतील मोठा दलाल असलेल्या बीडच्या संजय सानप याला पुणे पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
भाजपचा पदाधिकारीच निघाला आरोग्य भरतीच्या पेपरफुटी प्रकरणातील दलाल
भाजपचा पदाधिकारीच निघाला आरोग्य भरतीच्या पेपरफुटी प्रकरणातील दलालSaamTvNews
Published On

पुणे : एकीकडे TET परीक्षा (TET Exam) गैरव्यवहारात मोठ-मोठे मासे गळाला लागत असताना दुसरीकडे आरोग्य भरतीच्या पेपरफुटीचा तपासही पुढे जातोय. आरोग्य भरतीतील मोठा दलाल असलेल्या बीडच्या संजय सानप (Sanjay Sanap) याला पुणे पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. हाच सानप भाजप (BJP) युवा मोर्चाचा पदाधिकारी आहे. BJP Office-bearer Arrested In Case Of Health Recruitment Paper Leak

भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाचा बीड जिल्हा उपाध्यक्ष संजय सानप हा थेट पेपरफुटी प्रकरणातील दलाल निघालाय. पुणे पोलिसांनी थेट बीडमध्ये जाऊन सानपला गजाआड केलंय. आरोग्य भरती परीक्षेत गट-ड आणि क पदाचा पेपर परिक्षेपुर्वी अनेक विद्यार्थ्यांना सानपने पाठवला असल्याचे निष्पन्न झालंय. बीडच्या पाटोद्यातील असलेला सानप हा दलाल म्हणून काम करत होता.

हेही वाचा -

भाजपचा पदाधिकारीच निघाला आरोग्य भरतीच्या पेपरफुटी प्रकरणातील दलाल
टीईटी परिक्षा प्रकरणाचा तपास सीबीआयने करावा- फडवणीसांची मुख्यमंत्र्याकडे मागणी

क्लासचालकाच्या मोबाईलमध्ये म्हाडाच्या प्रत्येक पदासाठी किती पैसे घ्यायचे याचे रेट कार्ड सापडले होते. भरतीचा रेट एका कागदावर लिहिण्यात आला होता. तपासादरम्यान पोलिसांनी केलेल्या तांत्रिक विश्लेषणातून ही बाब पुढे आली आणि सानप खेळ संपला. भाजप पदाधिकारी असलेल्या सानपचे अनेक राजकीय नेत्यांसोबत फोटो त्याच्या फेसबुक प्रोफाईलवर दिसताहेत. असं असलं तरी देवेंद्र फडणवीस यांनी मात्र या प्रकरणी हात झटकलेत.

सानपने किती परीक्षार्थींना पेपर देवून त्यांच्याकडून किती पैसे घेतले? त्याने कोणाकडून हा पेपर मिळवला? तसेच सानपच्या घराची झडती घेऊन त्यात मिळणाऱ्या पुराव्याचा आधारे पोलीस तपासात पुढे जात आहेत. मात्र आरोग्य पेपरफुटी प्रकरणात थेट भाजपचा पदाधिकारी दलाल असल्याचं उघड झाल्याने भाजपची या प्रकरणात चांगलीच गोची झालीये.

Edited By - Nupur Uppal

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com