टीईटी परिक्षा प्रकरणाचा तपास सीबीआयने करावा- फडवणीसांची मुख्यमंत्र्याकडे मागणी

टीईटी परिक्षा प्रकरणाचा तपास सीबीआयमार्फत करण्यात यावा अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
टीईटी परिक्षा प्रकरणाचा तपास सीबीआयने करावा- फडवणीसांची मुख्यमंत्र्याकडे मागणी
टीईटी परिक्षा प्रकरणाचा तपास सीबीआयने करावा- फडवणीसांची मुख्यमंत्र्याकडे मागणीSaam Tv
Published On

सुशांत सावंत, मुंबई

मुंबई: महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषद आयुक्त आणि महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेचा अतिरीक्त कार्यभार सांभाळणारे तुकाराम सुपे यांना पुणे पोलिसांनी चौकशीला बोलावलं होत. आरोग्य भरती (Health Recruitment) आणि म्हाडा पेपर (MHADA) फुटी प्रकरणात अटक (Arrested) आरोपी डॉ. प्रीतिश देशमुख यांच्या घरी टीईटी परीक्षेची ओळखपत्र याच्या घरी सापडल्यानंतर पुणे पोलिसांचा (police) टीईटी परीक्षेचा घोटाळा शोधण्यासाठी तपास सुरू केला. याप्रकरणी आता सीबीआयमार्फत चौकशी करण्यात यावी असं अशी मागणी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्याकडे केली आहे. (CBI should probe TET exam case: Fadnavis demands CM)

हे देखील पहा -

टीईटी परीक्षा घोटाळा (TET Exam Scam) प्रकरणी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आपल्या ट्विटमध्ये म्हणाले की, टीईटी परीक्षा घोटाळा प्रकरणी तुकाराम सुपेकडे 88 लाख रुपये सापडल्यानंतर आज आणखी 2 कोटी रुपये रोख आणि सोने सापडले. म्हाडाच्या परीक्षेत गैरप्रकार करणार्‍या जीए सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजीला अभय याच तुकाराम सुपेंनी (Tukaram Supe) दिले. काळ्या यादीतील या कंपनीला त्यांनीच 3 महिन्यात बाहेर काढले. आता या जीए सॉफ्टवेअरचे संचालक डॉ. प्रीतिश देशमुखकडे पोलिस भरतीची ओळखपत्र सापडली आहेत. म्हणजे आरोग्य भरती, म्हाडा, टीईटी, पोलिस भरती हे सर्व घोटाळे एकाच माळेचे मणी दिसताहेत. या सर्व घोटाळ्यातील गुंतागुंत पाहता सीबीआय चौकशी व्हायलाच हवी अशी मागणी फडवणीस यांनी केली.

टीईटी परिक्षा प्रकरणाचा तपास सीबीआयने करावा- फडवणीसांची मुख्यमंत्र्याकडे मागणी
टीईटी घोटाळा प्रकरणातील प्राध्यापक आणि शिक्षक अजून ही फरार...

सीबीआय चौकशी (CBI Enquiry) झाली तरच या घोटाळ्यांमधील मंत्रालयातील धागेदोरे उघड होतील, अन्यथा वसुलीचे हे आणखी एक प्रकरण कधी उजेडात येणारच नाही. माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की, लाखो विद्यार्थ्यांना वेठीस धरणार्‍या खर्‍या गुन्हेगारांचा शोध घ्यायचा असेल तर हे प्रकरण सीबीआयला सोपवा अशी मागणी फडवणीस यांनी मुख्यमंत्र्याकडे केली आहे.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com