udayan raje bhosale
udayan raje bhosaleSaam Tv

उदयनराजे भोसले यांनी घेतली किरीट सोमय्या यांची भेट

किरीट सोमय्यांची विचारपूस करण्यासाठी उदयनराजे भोसले रात्रीच रुग्णालयात पोहोचले
Published on

पुणे - शनिवारी (५ फेब्रुवारी) भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) पुणे दौऱ्यावर होते. यावेळी किरीट सोमय्या पुणे (Pune) महापालिकेत जम्बो कोविड सेंटर संदर्भात तक्रार करण्यासाठी पुणे महापालिका कार्यालयात आले होते. पण यावेळी प्रचंड मोठा गदारोळ झाला. सोमय्या पुणे महापालिकेच्या इमारतीत प्रवेश करताना तिथे आधीपासूनच उपस्थित असलेल्या शिवसेना कार्यकर्त्यांनी त्यांना घेरले आणि मोठी झटापट झाली.

हे देखील पहा -

या झटापटीत सोमय्या पायऱ्यांवरून थेट खाली कोसळले. त्यांना दुखापत झाली असून रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान रात्री पुण्यात जाऊन उदयनराजे भोसले यांनी रुग्णालयात जाऊन किरीट सोमय्या यांच्या तब्येतीची विचारपूस केली. याभेटीनंतर उदयनराजे भोसले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

udayan raje bhosale
Railway Mega block: आज 'या' मार्गावर असणार मेगा ब्लॉक, जाणून घ्या

ते म्हणले की, माजी खासदार किरीट सोमय्या हे सातत्याने भ्रष्टाचाराची पोल खोलत असल्याने त्यांचेवर झालेला प्राणघातक ठरणारा हल्ला अतिशय निंदनिय आहे. सोमय्यांच्या मुद्यांचा विरोध गुद्याने केला गेला असल्याने, लोकशाही संकटात सापडली आहे. असा हल्ला करुन किरीट सोमय्यांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न झाला आहे. ही घटना म्हणजे वैचारिक महाराष्ट्रातील लोकशाहीची अधोगती आणि झुंडशाहीची नांदी आहे. देशातील कोणत्याही व्यक्तीवर अश्या हल्याच्या घटना घडल्यास अश्या घटनेचे कोणीही समर्थन करु शकणार नाही असे देखील ते यावेळी म्हणले.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com