सुशांत सावंत
Maharashtra Monsoon Session News : आज पावसाळी अधिवेशनाचा पाचवा दिवस आहे, गेले चार दिवस वादळी ठरले. आजच्या पाचव्या दिवशी सत्ताधारी-विरोधकांमध्ये विधानसभेच्या पायरीवर जोरदार राडा पाहायला मिळाला. त्यानंतर विधीमंडळातील वातावरण चांगलंच पेटलं आहे. तर दुसरीकडे विधीमंडळात भाजप (BJP) आमदाराने थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे महापालिकेच्या कारभारावर जोरदार टीका केली आहे.
विधानसभेच्या पायरीवर विरोधक-सत्ताधाऱ्यांमध्ये आज जोरदार राडा पाहायला मिळाला. तर आज विधीमंडळात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू असताना भाजपनेही मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे. भाजप आमदार संजय केळकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे महापालिकेच्या कारभारावर भाजपने जोरदार टीका केली.
भाजप आमदार संजय केळकर म्हणाले,आमचं दुखणं वेगळं आहे, ते सांगताही येत नाही आणि दाखवताही येत नाही. ठाण्यात काही अधिकाऱ्यांमुळे अनधिकृत बांधकामा मोठ्या प्रमाणात सुरू आहे. हे अधिकारी या अनधिकृत बांधकामात प्रत्येकी चौरस फूटांप्रमाणे पैसे घेतात. या संदर्भात अनेक तक्रारी पोलीस स्थानकांत दिल्या आहेत. मात्र, कोणतीही कारवाई होत नाही. या उलट या अधिकारी यांना महत्वाच्या जबाबदारी देऊन त्यांना त्या ठिकाणी ठेवलं जात असताना हे अधिकारी सरकारचे जावई आहेत का ? त्यामुळे या अधिकाऱ्यांसमोर महापालिका आयुक्त हतबल आहे'.
'महेश अहिर नामक अधिकाऱ्याची डिग्री बोगस असतानाही त्यांना अनेक महत्वाच्या ठिकाणी बसविण्यात आले आहे. हे अधिकारी सुपारी घेऊन काम करतात, अशी टीका केळकर यांनी केली. तर महेश अहिर हे मुख्यमंत्री एकनाथ शिदे यांच्या जवळचे मानले जातात.
Edited By - Vishal Gangurde
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.