मानसिक संतुलन बिघडलेल्या माणसावर काय बोलणार, महाजनांचा रोख कोणकडे?

भाजपचे आमदार तथा माजी मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी राज्यातील वीज संकटावरुन सरकारवरती टीका केली आहे.
Girish Mahajan
Girish Mahajan Saam TV
Published On

पुणे: भाजपचे आमदार तथा माजी मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी राज्यातील वीज संकटावरुन सरकारवरती टीका केली आहे. आमचं सरकार होतं त्यावेळी राज्यात एकही दिवस लोडशेडिंग नव्हते हे सरकार असमर्थ आहे अशी टीका महाजनांनी केली आहे. त्याचबरोबर त्यांनी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंवरतीही टीका केली आहे. एकनाथ खडसे (Eknath Khadase) नेहमीच म्हणत असतात भाजपा माझ्यामुळे राज्यात माझ्यामुळे मोठी झाली. याच वक्तव्यावर महाजननांनी खडसेंवरती निशाणा साधला आहे.

सारखं मी मोठं केलं मोठं केलं असं खडसे म्हणतात. तुम्ही मोठं केलं की तुम्हाला पक्षाने मोठं केलं. खडसे स्वतःची पाठ थोपटून घेताहेत, त्यांचं मानसिक संतुलन बिघडले आहे. त्यांना मी जेवढा ओळखतो तेवढा कोणी ओळखत नाही, 25 वर्ष मी त्यांच्यासोबत होतो. मानसिक संतुलन बिघडलेल्या माणसावर परत काय बोलणार? अजून त्यांचं मानसिक संतुलन बिघडवायचं नाही, मला त्यांची काळजी आहे असा टोला गिरीश महाजनांनी खडसेंना लगावला आहे.

राज्यातील कोळसा संकटामुळे लोडशेडिंग सुरु आहे. यावरुन महाजन म्हणाले की कोळशाच्या स्टॉक आहे, मात्र महाविकास आघाडीचा ढिसाळ कारभार आहे त्यामुळे वीज टंचाई निर्माण झाली आहे. यामागे दलाली चे कारण आहे, चढ्या भावाने वीज खरेदी करायची आणि टक्केवारी मिळवायची. असं कोणतही विजनिर्मीत केंद्र आहे जे कोळसामुळे बंद आहे एकही नाही त्यामुळे कृत्रीम टंचाई निर्माण करण्याचे काम सुरु असल्याचे महाजन म्हणाले.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com