पत्राचाळ प्रकरण : प्रविण राऊत यांनी 95 कोटी घेतले, अतुल भातखळकरांचा आरोप

Atul Bhatkhalkar
Atul BhatkhalkarSaam Tv
Published On

मुंबई : अंमलबजावणी संचालयानं म्हणजेच ईडीनं (Enforcement directorate) पत्राचाळ गैरव्यवहाराचे (Patrachawl case) आरोप असलेल्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत (sanjay raut) यांची संपत्ती ५ एप्रिलला जप्त केली. तसंच राऊत यांची अलिबाग येथील मालमत्ता, दादर येथील फ्लॅटही ईडीनं जप्त केला. पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणात ईडीनं ११ कोटी १५ लाख ५६ हजार ५७३ रुपयांची मालमत्तेवर टाच आणल्याची माहिती समोर आली. या प्रकरणावर भाजपचे आमदार अतुल भातखळकर (Atul bhatkhalkar) यांनी प्रतिक्रिया दिलीय. पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणात (Pravin raut) प्रविण राऊत यांनी 95 कोटी घेतले. तर ५५ लाख संजय राऊत यांच्या खात्यात आले. असा आरोप भातखळकर यांनी माध्यमांशी बोलताना राऊत कुटुंबावर केला आहे.

Atul Bhatkhalkar
बॉक्स ऑफिसवर KGF चाप्टर २ 'यश'स्वी ; तीन दिवसांत तब्बल १४० कोटींची कमाई

तसंच भातखळकर माध्यमांशी बोलताना म्हणाले, शिवसेनेने मराठी माणसाच्या नावावर भावनिक राजकारण केले आणि स्वत:ची घरं भरली. पत्राचाळीचा विकास रखडला आहे. प्रविण राऊत सध्या तुरुंगात आहेत. पत्राचाळीत विकासकांनी चार-चार लोकांना एफएसआय विकला आणि जॉनी जोसेफ कमीटीच्या शिफारशीनुसार कंत्राट दिले. सेल कंपोनेट इतरांना विकला. 672 मराठी माणसाला घर खाली करायला लावली. ब्लॅक लिस्टमध्ये असलेल्या रेलीकरोनला कंत्राट दिला. तसंच 100 फरजी लोकांना घर विकली. त्यामुळे ईडीला माझी मागणी आहे की, या 100 लोकांची सुद्धा चौकशी झाली पाहिजे. मुंबईमध्ये मेहुण्यांचं खूप राज्य आहे. असा टोलाही भातखळकर यांनी नाव न घेता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लगावला.

Edited By - Naresh Shende

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com