उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर दरेकरांचा हल्लाबोल; म्हणाले, नाईलाज म्हणून...

राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालं असून अतिवृष्टीमुळे (Heavy Rainfall) मराठवाड्यात देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.
Pravin Darekar Vs Uddhav Thackeray
Pravin Darekar Vs Uddhav ThackeraySaam TV
Published On

मुंबई : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना उशिरा का होईना शहाणपण सुचलं. शेतकऱ्यांना भेटायला त्यांना आधी भेटायला वेळ नव्हता. मात्र, आता त्यांना शेतकऱ्यांच्या बांधावर जावस वाटलं. मात्र, आजचा दौरा केवळ अर्ध्या तासांचा आहे असं म्हणत भाजपनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी उद्धव ठाकरेंच्या आजच्या दौऱ्यावर टीका केली आहे.

राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालं आहे. या अतिवृष्टीमुळे (Heavy Rainfall) मराठवाड्यात देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. याच नुकसानीची पाहणी करण्यासाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज औरंगाबादचा (Aurangabad) दौऱ्यावर आहेत. ठाकरेंच्या याच दौऱ्यावर आता भाजपसह शिंदे गटाकडून टीका करण्यात येत आहे.

पाहा व्हिडीओ -

याच दौऱ्याबाबत भाजपनेते प्रवीण दरेकर यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. दरेकर म्हणाले, उद्धव ठाकरे यांना उशिरा का होईना शहाणपण सुचलं. शेतकऱ्यांना भेटायला त्यांना आधी भेटायला वेळ नव्हता. मात्र, आता त्यांना शेतकऱ्यांच्या बांधावर जावस वाटलं.

जेव्हा कोकणात तौक्ते वादळ आले तेव्हा आम्ही उद्धव ठाकरे यांना भेटलो. आता नाईलाज म्हणून ते शेतकऱ्यांच्या बांधावर जात आहेत. त्यांनी अशा प्रकारे भेट द्यायला हवी शिवाय त्यांच्या या दौऱ्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे आभार मानले पाहिजेत.

कारण त्यांच्यामुळे ते बाहेर पडले असून उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांनना भेटलं पाहिजे. पण ते कमकुवत आहेत ते भेटणार नाहीत असा हल्लाबोल दरेकर यांनी केला. ते पुढे म्हणाले, उद्धव ठाकरेंना खरंच शेतकऱ्यांची कणव असेल तर त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना भेटावं शिवसेनेच्या राहिलेल्या आमदारांना देखील कामं करायची आहेत.

Pravin Darekar Vs Uddhav Thackeray
PMPML मधून विना तिकीट प्रवास करणाऱ्या फुकट्यांवर मोठी कारवाई; १३ लाखांचा दंड वसूल

यावेळी त्यांनी अंबादास दानवेंच्या (Ambadas Danave) वक्तव्यावर देखील भाष्य केलं, तुम्हाला अडवलं कोणी तुमचे सरकार होते तेव्हा तुम्ही काय केलं उद्धव ठाकरे असे बांधावर गेले होते का? मुख्यमंत्री असताना सोलापूरला गेले तेव्हा रेड कार्पेटवर जाऊन निघून आले. तेव्हा फडणवीस चिखलात बांधवरती फिरत होते असं दरेकरांनी सुनावलं. तर आदित्य ठाकरेंनी आधी ओला दुष्काळ म्हणजे काय हे समजून घ्यावं, पिकं पाणी काय हे समजून घ्यावं असा टोला देखील दरेकर यांनी यावेळी लगावला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com