सुशांत सावंत
मुंबई: राज्यसभेसाठी सध्या सर्वच पक्षाची धावपळ सुरू झाली असताना आता विधान परिषदेसाठी देखील इच्छुकांनी हालचाली सुरू केल्या आहेत. भाजपमध्ये तर आतापासूनच इच्छुकांनी लॉबिंग करायला सुरुवात केली असून, याची यादी बरीच मोठी आहे. विधान परिषदेवर भाजपचे चार जण सहज निवडून जाणार असल्याने या चार जागासाठी जोरदार लॉबिंग सुरू आहेत.
कुणाला मिळु शकते पुन्हा संधी?
विधान परिषदेवर जाण्यासाठी भाजपमध्ये बऱ्याच जणांची लॉबिंग सुरू असून, विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांना पुन्हा संधी मिळू शकते तर प्रसाद लाड आणि सदाभाऊ खोत यांच्यापैकी कुणाला तरी एकाला पुन्हा विधान परिषदेची संधी मिळू शकते.
हे नेते देखील इच्छुक
एकीकडे प्रवीण दरेकर यांचे नाव जवळपास निश्चित झालेले असताना माजी मंत्री पंकजा मुंडे, चित्रा वाघ, अनिल बोंडे, राम शिंदे, कृपाशंकर सिंग यांचीही नावे चर्चेत आहेत. सगळ्यात महत्वाचे म्हणजे विनायक मेटे, सुरजित सिंह ठाकूर यांना विधान परिषदेत संधी मिळणार नाही अशी जोरदार चर्चा सध्या सुरु आहे. विधान परिषदेवर निवडणूक यायचे असेल तर 27 मतांची आवश्यकता आहे. भाजप आणि मित्रपक्ष मिळून संख्याबळ 113 होत आहे. त्यामुळे भाजपच्या सहज चार जागा निवडून येऊ शकतात.
राज्यात सध्या राज्यसभा निवडणुकांचे वारे आहे. सहा जागांसाठी राज्यसभेची निवडणूक पार पडत आहे. भाजपचे दोन, राष्ट्रवादी एक, काँग्रेस एक असे पाच उमेदवार फिक्स राज्यसभेवर निवडणून जाऊ शकतात. प्रश्न आहे सहाव्या जागेचा सहाव्या जागेसाठी शिवसेनेची तयारी सुरु झाली आहे. शिवसेना सहावी जागा लढणार आहे. जर छत्रपती संभाजी राजेंनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला तर त्यांना सहावी जागा देऊ असे शिवसेनेकडून सांगण्यात आले आहे. मुख्यमंत्र्यांनी संभाजी राजेंसमोर काही अटी ठेवल्या आहेत.
विधान परिषदेच्या 10 जागांचा कार्यकाळ येत्या जूनमध्ये संपत असून, प्रवीण दरेकर, सुभाष देसाई, दिवाकर रावते, सदाभाऊ खोत, सुरजीतसिंह ठाकुर, विनायक मेटे, प्रसाद लाड, संजय दौंड, रामराजे निंबाळकर, रवींद्र फाटक या दहा जागा रिक्त होत आहे.
Edited By: Pravin Dhamale
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.