Pune By Election: 'ही सगळी सहानभुतीसाठी केलेली स्टंटबाजी...' पैसे वाटल्याच्या आरोपावर बावनकुळेंची प्रतिक्रिया; ठाकरेंवरही केला हल्लाबोल

ओवेसी जरी यांच्याकडे नाही आला, तरी हे ओवेसीकडे जातीलच,अशा शब्दात त्यांनी ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे.
Chandrashekhar Bavankule
Chandrashekhar Bavankulesaam tv
Published On

Pune By Election: पुण्यामधील कसबा आणि चिंचवड पोट निवडूकीच्या प्रचाराच्या तोफा थंडावल्या असल्या तरी आरोप प्रत्यारोपच्या फैरी झडत आहेत. महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांनी निवडणूकीत मोठ्या प्रमाणावर पैसे वाटप होत असल्याचा आरोप केला होता. तसेच याविरोधात त्यांनी उपोषणही सुरू केले होते.

या प्रकरणावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली असून रविंद्र धंगेकरांसह महाविकास आघाडीवर त्यांनी जोरदार निशाणा साधला आहे. (Maharashtra Politics)

Chandrashekhar Bavankule
Kasba Bypoll Election : रवींद्र धंगेकर यांचं 5 तासानंतर उपोषण मागे; कसबा मतदारसंघात नेमकं काय घडलं?

काय म्हणाले चंद्रशेखर बावनकुळे...

"गेले सात दिवस कसबा आणि चिंचवड मधील प्रचारात होतो. मतदार भाजपच्या बाजूने आहे. महाविकास आघाडीच्या पायाखालची वाळू सरकली आहे. म्हणून त्यांचा उमेदवार स्टंटबाजी करत असून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करत आहे," अशी प्रतिक्रिया चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे.

तसेच याबद्दल पुढे बोलताना त्यांनी "प्रचार संपल्यानंतर अशा पद्धतीने प्रचार सुरू ठेवण्याचे कारस्थान आहे. मात्र ते मतदारांवर पैसे घेतल्याचा आरोप करत आहेत. शरद पवारांच्या मंचावरून मुस्लिम मतदारांना कुठूनही या, मात्र, मोदी आणि संघाला पराभूत करा असे आवाहन करण्यात आले आणि त्यानंतर मतदारांमध्ये प्रचंड नाराजी आहे त्यामुळेच आजची स्टंटबाजी झाली," असा हल्लाबोलही त्यांनी केला आहे.

Chandrashekhar Bavankule
Sonia Gandhi: सोनिया गांधी लोकसभा निवडणूक लढवणार नाही, रायपूर अधिवेशनात केली घोषणा

उद्धव ठाकरेंवरही केला हल्लाबोल...

यावेळी चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवरही (Udhav Thackeray) जोरदार हल्लाबोल केला. "ओवेसी जर उद्धव ठाकरेंकडे जाणार नसतील तर ओवेसी कडे उद्धव ठाकरे जातील. ज्या समाजवादी पक्षाने रामचरित मानस जाळलं, त्या सपाचे नेते उद्धव ठाकरेंना भेटायला गेले आहे. उद्धव ठाकरेंना काय म्हणावं उद्धव ठाकरेंनी किती खालची पातळी गाठली आहे," असे ते यावेळी म्हणाले.

तसेच पुढे बोलताना त्यांनी, "मी शंभर टक्के सांगतो ओवेसी जरी यांच्याकडे नाही आला, तरी हे ओवेसीकडे जातीलच,अशा शब्दात त्यांनी ठाकरेंवर हल्लाबोल केला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com