मुंबई : राज्यात राज्यसभेच्या निवडणुकीवरून जोरदार रस्सीखेच सुरु झाली आहे. राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी थेट भाजप विरुद्ध शिवसेना अशी लढाई आहे. महाविकास आघाडीचे चारही उमेदवार जिंकण्यासाठी सर्व वरिष्ठ नेत्यांनी चांगलीच कंबर कसली आहे. कालच महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी हॉटेल ट्रायडंटमध्ये महाविकास आघाडीच्या आमदारांना राज्यसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शन केलं. सध्या शिवसेनेचे सर्व आमदार हे हॉटेल ट्रायडंटमध्ये असून त्यांच्यावर प्रमुख नेत्यांचं लक्ष आहे. शिवसेना, भाजपने ही राज्यसभा निवडणूक प्रतिष्ठेची केल्याने साऱ्यांचे लक्ष वेधले आहे. दरम्यान, या ट्रायडंट हॉटेलमध्ये भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar) हे एक तास होते.त्यामुळे शेलारांनी हॉटेलमध्ये कोणाची भेट घेतली, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. (Rajya Sabha Election)
राज्यात राज्यसभेच्या निवडणुकीवरून महत्वाच्या घडामोडींना वेग आला आहे. काल महाविकास आघाडीची ट्रायडंट हॉटेलमध्ये महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीला १३ अपक्ष आमदारांनी हजेरी लावली. आजच समाजवादी पक्षाच्या दोन आमदारांची मतेही महाविकास आघाडीच्या पारड्यात पडणार आहे. शिवसेना आणि भाजपने ही राज्यसभा निवडणूक प्रतिष्ठेची केल्याने एका एका आमदाराची मते महत्वाची ठरणार आहे.
१३ अपक्ष आमदारांची मते देखील महाविकास आघाडीला मिळणार आहे. ही निवडणूक जिंकण्यासाठी आणि आमदार फुटू नये यासाठी महाविकास आघाडीने त्यांच्या आमदारांची व्यवस्था हॉटेल ट्रायडंटमध्ये करण्यात आली आहे. याच हॉटेलमध्ये भाजप नेते आशिष शेलार देखील गेले होते. या हॉटेलमध्ये शेलार हे एक तास होते.
दरम्यान,आशिष शेलार शेलार या हॉटेलमध्ये प्रवेश करताच सर्वांच्या भुवया उंचावल्याचे चित्र पाहायला मिळाले. आशिष शेलार या हॉटेलमध्ये कोणाला भेटले, कोणाशी चर्चा केली अशा चर्चांना उधाण आले आहे. याच ट्रायडंट हॉटेलमध्ये शिवसेना आमदारांची व्यवस्था करण्यात आली आहे. या हॉटेलमध्ये भाजप उपाध्यक्ष सुनील कर्जतकर हे देखील आहेत. त्यांची भेट घेण्यासाठी आशिष शेलार गेले होते. तसेच हॉटेलमधील कर्जतकर यांच्या
कार्यकर्त्यांशीही संवाद साधला. त्यानंतर कर्जतकर आणि शेलार या दोघांनी एकत्र चर्चा करत चहा प्यायले. तासभर चर्चा केल्यानंतर हॉटेलमधून बाहेरमधून बाहेर पडले. मात्र, आशिष शेलार हॉटेल ट्रायडंटमध्ये गेल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.