उद्धव ठाकरेंकडून मुंबई महापालिकेची सत्ता मिळविण्यासाठी 'हा' रडीचा डाव; आशिष शेलारांची टीका

उद्धव ठाकरे, सत्तेसाठी तुम्हाला मुंबईचा रंग का बदलायचा आहे? असा थेट सवाल आमदार ॲड. आशिष शेलार यांनी उपस्थित केला.
uddhav thackeray and ashish shelar
uddhav thackeray and ashish shelar saam tv
Published On

सुशांत सांवत

adv Ashsish Shelar News : 'मुंबई महानगरपालिकेची सत्ता मिळवण्यासाठी रडीचा डाव खेळण्याची सुरुवात करण्यात येत आहे. उद्धव ठाकरे, सत्तेसाठी तुम्हाला मुंबईचा रंग का बदलायचा आहे? असा थेट सवाल आमदार ॲड. आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी उपस्थित केला. भाजप आयोजित जागर मुंबईचा या सभेतून शेलार यांनी उपस्थितांना संबोधित केले. (Latest Marathi News)

uddhav thackeray and ashish shelar
Raj Thackeray : 'आपल्या देशात कलाकारांची नावे कुठे देतात?' राज ठाकरे स्पष्टच बोलले

वांद्रे येथील सरकारी वसाहतीमध्ये मुंबई भाजपातर्फे आज जागर मुंबईचा या अभियानातंर्गत पहिली सभा संपन्न झाली. या सभेत अॅड. शेलार म्हणाले, 'राज्यात अडीच वर्षांची सत्ता भोगल्यानंतर आता मुंबई महानगरपालिकेची सत्ता बळकाविण्यासाठी उद्धवजी ठाकरे यांनी मुंबईत धार्मिक तुष्टीकरण करण्याला सुरुवात केली आहे. पण आम्ही ठामपणे सांगतो ना मराठी, ना मुस्लिम उद्धवजींना मते देणार नाहीत'.

'सलग २५ वर्ष तुम्ही मनपात सत्ता भोगली, मग तुमच्या कामावर तुम्ही मते का मागत नाहीत? एकही विकासकाम केल्याचे सांगता येत नाही, म्हणून मुंबई महानगरपालिकेची सत्ता मिळवण्यासाठी रडीचा डाव खेळण्याची सुरुवात करण्यात येत आहे. उद्धवजी तुम्हाला मुंबईचा रंग का बदलायचा आहे?', असा सवाल शेलारांनी उपस्थित केला.

uddhav thackeray and ashish shelar
Uddhav Thackeray Speech : महाराष्ट्राला मुर्ख समजलात का? उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान मोदींवर थेट निशाणा

पुढे म्हणाले की, '२२ ऑक्टोबर रोजी सामना दैनिकातून मराठी मुस्लिम अशी दुही निर्माण करणारी बातमी देण्यात आली होती. या बातमीवरुन उद्धव ठाकरेंच्या राजकारणाचा समाचार घेतला. 'आमच्या कोकणातील मराठी मुस्लिम बांधव आजपर्यंत कधीही वेगळी चूल मांडत नाहीत. ते सर्वांसोबत सण उत्सवात सुख दु:खात मिळून मिसळून राहतात मग तुम्ही का वेगळी चूल मांडताय? असा थेट सवाल उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना केला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com