BJP Meeting News : एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला डावलून भाजपचा स्वबळाचा नारा? जेपी नड्डांसोबतच्या बैठकीत आगामी निवडणुकांवर चर्चा

BJP Meeting : भाजपच्या या महत्त्वपूर्ण बैठकीत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेबाबत काहीही चर्चा झाली नसल्याची माहिती समोर येत आहे.
Eknath SHinde-JP Nadda
Eknath SHinde-JP NaddaSaam TV

Pune News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला डावलून भाजप स्वबळावर राज्यात निवडणूक लढवणार की काय अशी चर्चा सुरु झाली आहे. कारण भाजप लोकसभेच्या सर्व 48 जागांसाठी तयारी करत असल्याची माहिती समोर येत आहे.

तर विधानसभेसाठीच्या 225 जागांसाठी तयारी करण्याचे आदेश भाजप नेत्यांना देण्यात आल्याची माहिती सूत्रांच्या माध्यमातून समोर आली आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या उपस्थितीत आज आमदार-खासदार यांची बैठक आज पार पडली. तेथे आगामी निवडणुकांच्या जागा वाटपाबाबतच्या धोरणांवर चर्चा झाल्याची माहिती आहे.

Eknath SHinde-JP Nadda
Uddhav Thackeray : ठाकरे गटाचा लोकसभेचा पहिला उमेदवार ठरला? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिले आदेश

भाजपच्या या महत्त्वपूर्ण बैठकीत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेबाबत काहीही चर्चा झाली नसल्याची माहिती समोर येत आहे. भाजप प्रदेश कार्यकारणीच्या बैठकीत फक्त समारोपाचा भाषणात शिवसेनेचा उल्लेख करण्यात आला आहे. (Breaking Marathi News)

भाजप नेत्यांना सर्व मतदारसंघात तयारी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. लोकसभेसाठी मागील निवडणुकीपेक्षा जास्त जागांवर तयारी करण्याच्या तर विधानसभेसाठी 288 पैकी 225 जागांवर तयारी करण्याच्या सूचना भाजप नेत्यांना दिल्या असल्याची माहिती आहे. (Maharashtra Political News)

Eknath SHinde-JP Nadda
Devendra Fadnavis On Bailgada Sharyat: 'हा शेतकऱ्यांचा आणि महाराष्ट्राचा मोठा विजय', बैलगाडा शर्यतीवर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया

लोकापर्यंत काम पोहोचवा आणि मतदारसंघ बांधण्याचे आदेश जेपी नड्डा यांनी दिले आहेत. बूथ मजबूत करण्यापासून सुरुवात करण्याची सूचना देण्यात आली आहे. सर्व जागा लढण्यासाठी तयारी करण्याचे आदेशही देण्यात आले आहे. भाजपकडून करण्यात आलेल्या सर्वेतून जी माहिती समोर आली आहे त्या पार्श्वभूमीवर भाजपने रणनिती बदलली आहे का? शिवसेना-भाजप युतीचं काय होणार? असे प्रश्न उपस्थित होत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com