नवी मुंबई: गणेश नाईकांना शह देण्याकरता अजित पवार मैदानात

नवी मुंबईतील अनेकांच्या प्रश्नाला सध्या अजित पवार हात घालत आहेत. नवी मुंबईत राष्ट्रवादीचे अस्तित्व नसल्याने राष्ट्रवादीची मोर्चेबांधणी करत आहेत.
नवी मुंबई: गणेश नाईकांना शह देण्याकरता अजित पवार मैदानात
नवी मुंबई: गणेश नाईकांना शह देण्याकरता अजित पवार मैदानातSaam TV
Published On

नवी मुंबई: भारतीय जनता पक्षाने (BJP) आणि राष्ट्रवादी पक्ष (NCP) यांनी नवी मुंबई महानगरापालिकेच्या (Navi Mumbai Muncipal Corporation) आगामी निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. या पार्श्वभूमीवर नवी मुंबईत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना आणून गणेश नाईक (Ganesh Naik) शक्तिप्रदर्शन करत आहे. तसेच राष्ट्रवादीचे नेते राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना नवी मुंबईत आणून गणेश नाईक यांना शह देण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेसकडून केला जात आहे, त्यामुळे नवी मुंबईत अजित पवार दौरा करत आहेत.

नवी मुंबई: गणेश नाईकांना शह देण्याकरता अजित पवार मैदानात
रिझर्व बँक ऐकत नसेल तर सहकारी बँकांनी कोर्टामध्ये जावं- शरद पवार

नवी मुंबईतील अनेकांच्या प्रश्नाला सध्या अजित पवार हात घालत आहेत. नवी मुंबईत राष्ट्रवादीचे अस्तित्व नसल्याने राष्ट्रवादीची मोर्चेबांधणी करत आहेत. अजित पवार याच्या समवेत शशिकांत शिंदे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड करत काम करत आहे. त्यामुळे गणेश नाईक यांना शहा देण्याची जोरदार तयारी सध्या करत आहेत. यामुळे सध्या अस्तित्वात असलेल्या १११ जुन्या प्रभागांचे नव्याने ३७ प्रभाग तयार केले जाणार असून त्यांची रचना भौगलिकट्या असणार आहे.

नवी मुंबई: गणेश नाईकांना शह देण्याकरता अजित पवार मैदानात
Mumbai: अखेर आर्यन खानला अटक; आजचा मुक्काम जेल मध्येच

अनेक मातब्बर नगरसेवकांचे प्रभाग जाणार

सद्या निवडून येणाऱ्या नगरसेवकांच्या प्रभाग रचनेत बदल होणार असल्याने घेतला आहे. शिवाय नव्याने प्रभाग रचना येणार असल्याने नव्या सोडतीत कुठला प्रभाग येतो त्यावर उमेदवार रिंगणात उतरण्याचा निर्णय घेण्याची शक्यता आहे. एकाच (दोनपेक्षा अधिक निवडून येणाऱ्या सदस्यांची पंचाईत झाली आहे. त्यांची प्रभाग रचना बदलल्याने त्यांनी आतापासून शेजारच्या प्रभागातील मतदारांच्या गाठीभेटी सुरु केल्या आहेत.

१११ प्रभागांचे होणार ३७ प्रभाग

मतदारांची संख्या सुमारे ८ लाख ५० हजार

सध्याची १८ वर्षावरील १० लाख ८० हजार व्यक्ती

● एक मतदार तीन उमेदवारांना मतदान करु शकेल. पूर्ण पॅनल निवडून आणण्यासाठी उमेदवारांना आणि त्या पक्षाच्या नेत्यांना कसरत करावी लागणार आहे. एक सदस्य असताना कुठलीच अडचण येत नव्हती. मात्र आता उमेदवारांना तीन प्रभागातील मतदारांपुढे मत मागण्यासाठी जावे लागेल.

आर्थिक नियोजन बिघडणार

पॅनल पध्दतीने प्रभाग रचना होणार असल्याने प्रत्येक पक्षांच्या तीन उमेदवारांच्या खर्चाचा बोजा उचलावा लागणार आहे. यापूर्वी एकाच प्रभागात पार्टी, सहलीचे नियोजन आणि आर्थिक वाटप केले जात होते. आता ते तीन प्रभागांत करावे लागणार आहे. महाविकास आघाडीच्या मध्ये मोठ्या गटबाजी दिसून येत आहे. सेना नेते मात्र कांग्रेस राष्ट्रवादी पक्षाला विचारत नाही त्यामुळे आघाडी होईल की नाही सांगत येत नाही असे सेनेचे नेते सांगत आहेत.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com