भाजपनेच एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री होऊ दिले नाही; संजय राऊत यांचा गौप्यस्फोट

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ सुरू आहे.
Eknath Shinde, Sanjay Raut
Eknath Shinde, Sanjay RautSaam Tv

मुंबई: २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर (Election) भाजपने युतीमध्ये दिलेला शब्द पाळला नाही. अडीच वर्षासाठी शिवसेनेचे मुख्यमंत्री हे एकनाथ शिंदेच होते. उद्धव ठाकरे यांच्या हेच मनात होते, पण भाजपने हे मान्य केले नाही. म्हणून युती तुटली. ज्यांनी त्यांना मुख्यमंत्री पदापासून रोखले, त्यांच्यासोबतच आज एकनाथ शिंदे जात आहेत, असं वक्तव्य शिवसेना (ShivSena) नेते संजय राऊत यांनी आज एका वृत्तवाहिनीशी बोलताना केले.

भाजपने त्यावेळी शब्द पाळला नाही. शिवसेनेला अडीच वर्षासाठी मुख्यमंत्री पद देण्याचे ठरले होते, तसा करारही दोन्ही पक्षात झाला होता. भाजपने निकालानंतर शब्द फिरवला. २०१९ शिवसेनेचा मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांचेच नाव उद्धव ठाकरे यांच्या मनात होते, पण भाजपने शब्द फिरवला आणि एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदापासून रोखले. त्यावेळी विधिमंडळ नेते एकनाथ शिंदेच होते. उद्धव ठाकरे यांना कधीच मुख्यमंत्री व्हायचे नव्हते, असंही एकनाथ शिंदे (Eknath Shinde) म्हणाले.

Eknath Shinde, Sanjay Raut
Eknath Shinde Live: शिवसेना आक्रमक! नवी मुंबईत एकनाथ शिंदेच्या विरोधात शिवसैनिकांचा आक्रमक पवित्रा

२०१९ ला काय झाले, भाजपने शिवसेनेसोबत काय केले हे सर्व एकनाथ शिंदे यांना माहित आहे. भाजप-शिवसेना (ShivSena) सरकार होते तेव्हा एका कार्यक्रमात व्यासपीठावरच शिंदे यांनी पालकमंत्री पदाचा राजीनामा दिला होता. आता लगेच एवढ काय झाले, लगेच आपण भाजपसोबत जाऊया म्हणत आहेत. आज शिवसेनेच्या ज्या आमदारांनी बंड केले आहे, त्या आमदारांनी अगोदर भाजपसोबत युती सोडून कोणाशीही करा असं म्हणाले होते. अगोदर त्यांनीच भाजपला विरोध केला, आता यांना काय झाले, असा सवालही यावेळी संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला.

Eknath Shinde, Sanjay Raut
महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू होणार का ? देशपांडे महाराजांनी केली मोठी भविष्यवाणी

आम्ही शिवसेना सोडलेली नाही: आमदार दीपक केसरकर

शिवसेनेच्या (ShivSena) ४० पेक्षा जास्त आमदारांनी बंड केल्यामुळे महाविकास आघाडी सरकार अडचणीत आले आहे. दरम्यान गेल्या पाच दिवसापासून शिवसेनेचे आमदार गुवाहाटीमध्ये आहेत. सेनेचे ज्येष्ठ नेते दीपक केसरकर यांनी बंड केले आहे, त्यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. 'आम्ही अजुनही शिवसेनेत आहोत, अजुनही आम्ही शिवसेना सोडलेली नाही, असा दावा आमदार दीपक केसरकर यांनी आज केला.

दीपक केसरकर म्हणाले, सध्या सगळीकडे आम्ही शिवसेनेतून बाहेर पडलो अस जाणवले जात आहे, पण आम्ही शिवसेनेतून बाहेर पडलेलो नाही. आम्ही आजही शिवसेनेतच आहोत. आमच्याकडे बहुमत आहे, आम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न करु नका. मंत्री एकनाथ शिंदे हेच आमचे नेते आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com