नवी मुंबई : या प्रकरणात आपल्याला जाणूनभुजून त्रास देण्यात येत असून, तो थांबला नाही. तर आपण 14 ऑक्टोबर दिवशी मंत्रालयासमोर आत्मदहन करू करू असा इशारा ही दिला आहे. जगदीप कुमार सेहगल यांनी व्यवसायामध्ये 25 करोड रुपयापेक्षा जास्त रकमेची फसवणूक करून, त्यातील पैशाचा वापर करून पोलिसांना आणि इतर राजकीय लोकांना हाताशी धरून 14 फेब्रुवारी दिवशी माझ्या आणि माझ्या पत्नीवर उरण पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हे देखील पहा-
आमचा कसलाही तपास किंवा चौकशी अद्याप झालेली नाही. हा गुन्हा सेशन कमीट असताना, आम्ही अद्यापपर्यंत जामीन न घेता पोलिसांना तपासात सहकार्य केले आहे. परंतु, एकापाठोपाठ एक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वारंवार तपासात अडथळे निर्माण करून, एक प्रकारे पदाचा गैरवापर केला जात आहे. त्याचप्रमाणे सहेगल आणि त्याचे सहकारी याच अधिकाऱ्यांच्या नावाचा वापर करून, तपास यंत्रणेत वारंवार अडथळे निर्माण करत आहेत.
शेतकऱ्यांना धमकावत देखील आहेत, असे ही जाधव यांचे म्हणणे आहे. तसेच माझ्या हत्येचा कट रचणे, खोट्या बातम्या छापून माझी बदनामी करणे, मानसिक त्रास देणे, पोलीसांकडून दमबाजी करणे, अशा विविध प्रकारे यंत्रणेचा चुकीच्या पद्धतीने वापर करून, मला त्रास देणे सुरू आहे. याबाबत वारंवार तक्रार करूनही पोलिस सहगल यांना पाठीशी घालत आहे. याबाबत आपण मुख्यमंत्री गृहमंत्री आणि इतर मान्यवरांना निवेदन ही दिले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे.
Edited By- Digambar Jadhav
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.